TMC Commissioner : ठाण्यातील रस्ता रुंदीकरण कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
या रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणारी बांधकामे निष्कासनाची कारवाई सुरु असून जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर जागा संपादनाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सुरु असून आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या रस्त्याची पाहणी केली.
ठाणे : ठाणे महापालिके(Thane Municipal Corporation)च्या वतीने कोलशेत येथील नंदिबाबा मंदिर चौक ते क्लॅरियंट कंपनी जंक्शन रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा(Vipin Sharma) यांनी पाहणी करून उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. यावेळी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर, जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेविका उषा संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, रामदास शिंदे, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आदी उपस्थित होते. शहरातील नंदीबाबा मंदिर चौक ते क्लॅरियंट कंपनी जंक्शन रस्त्याचे 40 मीटर रुंदी व 1200 मीटर लांबीचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर्स, सर्व्हिस डक्ट, कल्वर्ट आकर्षक पदपथ तसेच ग्रीन प्लान्टचे काम करण्यात येणार आहे. (Municipal Commissioner inspects road widening work in Thane)
बाधीत बांधकामे निष्कासनाचे काम 90 टक्के पूर्ण
या रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणारी बांधकामे निष्कासनाची कारवाई सुरु असून जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर जागा संपादनाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सुरु असून आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी सदर रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणाची उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. यासोबतच सदर रस्त्यावरील महावितरण विभागाने ट्रान्सफर्स, पोल हस्तांतरणाचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पालिका आयुक्तांनी स्वच्छता मोहिमेचीही केली पाहणी
स्वच्छ सर्वेक्षण 2022 मोहिमेअंतर्गत ठाणे शहरात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत शहरात सर्वत्र साफसफाई जोरदार सुरु आहे. या मोहिमेची ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. ठाणे महापालिका हद्दीतीतील आनंद नगर टोल नाका ते तीन हात नाका पर्यंत ठाणे महापालिकेने विशेष मोहीम सुरु केली आहे. या मध्ये मोट्या प्रमाणात 225 सफाई कर्मचारी तसेच स्वच्छता गाड्या आणि घंटा गाडी यांचा समावेश करण्यात आला होता. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनर मुळे विद्रूपी करण होत असल्याने असे अनधिकृत बॅनर देखील महापालिकेकडून काढण्यात आले. (Municipal Commissioner inspects road widening work in Thane)
इतर बातम्या