मालमत्ता व पाणी पुरवठा कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यापूर्वीच सर्व सहाय्यक आयुक्तांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचे दिलेले उदिष्ट साध्य करण्यासाठी जे थकबाकीदार कर भरणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची नळजोडणी खंडित करण्याचे आदेश दिले आहेत.

मालमत्ता व पाणी पुरवठा कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई
मालमत्ता व पाणी पुरवठा कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 8:27 PM

ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समिती निहाय दिलेल्या उद्दिष्टानुसार मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वतीने वसुलीसाठी विशेष मोहीम (Special Campaign) हाती घेण्यात आली असून माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील थकबाकीदारांवर धडक कारवाई (Action) करण्यात आली आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. (Municipal Corporation action on non-payment of property and water supply tax)

थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यापूर्वीच सर्व सहाय्यक आयुक्तांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचे दिलेले उदिष्ट साध्य करण्यासाठी जे थकबाकीदार कर भरणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची नळजोडणी खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षांअखेरीस ज्या मिळकतधारकांनी मालमत्ता कराची थकीत व चालू रक्कम अद्यापही महापालिकेस भरलेली नाही अशा मिळकत धारकांच्या मिळकतीवर सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिक्षक, कर निरीक्षक व कर विभागाचे कर्मचारी यांनी प्रत्यक्ष जप्तीची कारवाई केली.

यामध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील ब्लॉक क्र. 97 मधील सॅम्युल नाडर यांची फरसान फॅक्टरी, जितेंद्र पाटील यांचे पाच अनिवासी मिळकती (गाळे), महावीर कल्पवृक्ष (क्लब हाऊस ) या मिळकतीची एकूण 26 लाख रुपये थकबाकी असल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या तसेच आर मॉल घोडबंदर रोड या मिळकतीचा रक्कम 1.38 कोटी रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने या मॉलचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला असून आर मॉलला वॉरंट जप्तीची नोटीस बजविण्यात आलेली आहे. दरम्यान प्रभाग समितीमधील ब्लॉक क्र. 105 मधील चार मिळकतींची मालमत्ता कराची एकूण रक्कम 13.63 लाख थकीत रक्कम असल्याने, 14 मार्च, 2022 रोजी या मिळकतींचा जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता. परंतु लिलाव प्रक्रियेपुर्वीच संबंधित चारही थकबाकीधारकांनी कराची संपूर्ण रक्कम महापालिकेस जमा केलेली आहे. (Municipal Corporation action on non-payment of property and water supply tax)

इतर बातम्या

Manoj Katke : डोंबिवलीतील मनोज कटके हल्ला प्रकरण, भाजपचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण

मुंबई ठाण्यासह राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 40 अंशापार जाण्याची शक्यता

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.