Thane Demolition : ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
ब्रम्हांड येथील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम तोडून येथील विटांचे रेबिट जेसीबी मशिन व मनुष्यबळाच्या सहाय्याने हटविण्यात आले. तसेच नमिता पांडे, मनोरमानगर यांचे वाणिज्य 12 बाय 15 चौ. फूट मोजमापाची 2 अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामां (Illegal Construction)वर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित (Expelled) करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सुरज वॉटर पार्कलगतच्या सेवा रस्त्यावर अचल वाहनांवर होडिंगसाठीचे अंदाजे 30 बाय 20 चौ. फूट मोजमापाचे उभारण्यात आलेले अनधिकृत लोखंडी फॅब्रिकेशन गॅस कटरच्या सहाय्याने कट करण्यात आले. ब्रम्हांड येथील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम तोडून येथील विटांचे रेबिट जेसीबी मशिन व मनुष्यबळाच्या सहाय्याने हटविण्यात आले. तसेच नमिता पांडे, मनोरमानगर यांचे वाणिज्य 12 बाय 15 चौ. फूट मोजमापाची 2 अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली.
सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उपआयुक्त परिमंडळ-3 दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात केली.
मालमत्ता करातील 10 टक्के सवलतीला 15 जुलैपर्यत मुदतवाढ
ठाणे महापालिका हद्दीतील करदात्यांसाठी महापालिकेने करसवलत योजना लागू केली आहे. परंतु या करसवलतीचा कालावधी हा कमी असल्याने करसवलत योजनेस मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली होती. त्यानुसार व करदात्यांचा करसवलत योजनेस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन करसवलत योजनेस प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार जे करदाते सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी 16 जून ते 15 जुलै,2022 पर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. (Municipal Corporation cracks down on unauthorized constructions in the thane city)