नरेश म्हस्के यांचे आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर, आपलं काम बघा, योग्यता तपासा

आपण फक्त वारसा घेतलेला आहे. ती संस्कृती अंगीकारली नाहीये.

नरेश म्हस्के यांचे आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर, आपलं काम बघा, योग्यता तपासा
नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावलंImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 9:00 PM

ठाणे : आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही तारखा, आकडे जाहीर केले. याबाबत नरेश म्हस्के म्हणाले, जे प्रकल्प आहेत ते तीन साडेतीन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र बाहेर गेलेले आहेत. त्याला कारणीभूत तेच आहेत, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही कोण, तुमचं वय किती, पक्षांमध्ये किती काम केलं. तुमचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्ष या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलंय. आपली योग्यता तपासावी. माजी मुख्यमंत्र्यांना बोलायला सांगा, असा सल्लाही दिला.

आपलं काम कधी पाहिले का ? काम कधी तपासले का? आपली योग्य तपासावी? आतापर्यंत मुख्यमंत्री अद्यापही आपल्या विरुद्ध काही बोलेल नाहीत. बाळासाहेबांच्या संस्कृतीमध्ये ते वाढलेले आहेत. बाळासाहेबांच्या संस्कृतीप्रमाणे वागतात, असंही म्हस्के यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे यांना म्हणाले, आपण फक्त वारसा घेतलेला आहे. ती संस्कृती अंगीकारली नाहीये. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे बोलताय. खोके खोके काय बोलताय. कॅग चौकशी लागली. बारा हजार कोटी रुपये तुम्ही जे काही मुंबई महापालिकेत केले ना घटनाबाह्य नियमबाह्य कळेल जनतेला. आपण खोके कुठे लपवून ठेवले.

तुमचे खोक्यात बाहेर येणार आहेत. म्हणून तुम्ही आता महाराष्ट्राला लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहात. प्रोजेक्ट केलेले आहेत. ते आपल्या कमजोरीमुळे गेलेले आहेत. कारण आपण बंद रुमच्या बाहेर कधी आलाच नाही. आपल्या सरकारच्या कमजोरीमुळे हे सर्व प्रोजेक्ट बाहेर गेलेले आहेत, असा घणाघात नरेश म्हस्के यांनी केला.

चिंता करू नका या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार आहेत. आदित्य साहेब आता तुम्हाला साहेब म्हणायला नको. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीमध्ये वाढलेला आहोत म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय.

आपली योग्यता तपासा आणि नंतरच मुख्यमंत्र्यांवरती आरोप करा. मुख्यमंत्र्यांच्या विषयी अशाप्रकारे बोला. योग्यता तपासा. आपला बालीशपणा अख्ख्या महाराष्ट्राला माहीत पडलेला आहे. आपण किती बालीश आहात ते, असंही म्हस्के यांनी ठणकावून सांगितलं.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.