ठाण्यात राष्ट्रवादीचा शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; बोम्मईंच्या प्रतिमेला जोडे मारो!
मुंबईपाठोपाठ ठाण्यातही कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज ठाण्यात जोरदार निदर्शने केली.
ठाणे: मुंबईपाठोपाठ ठाण्यातही कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज ठाण्यात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली.
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा व्हिडीओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला होता. या घटनेचे कर्नाटकासह महाराष्ट्रात प्रचंड पडसाद उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी ही छोटी घटना असल्याचं सांगून आगीत तेल ओतलं. त्यामुळे शिवप्रेमी अधिकच आक्रमक झाले आहेत. बोम्मई यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोम्मई यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन केले. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेस जोडे मारले.
दोषींवर तात्काळ कारवाई करा
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केली. तर, नरेंद्र मोदी हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आले आहेत. मात्र, त्यांच्या भाजपच्या राज्यात या नराधमांनी हे कृत्य केले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आमची मागणी आहे. पुतळ्याला अभिषेक करण्यासाठी गेलेल्या लोकांना अडविणे योग्य नाही. आम्ही छत्रपतींना दैवत मानतो. याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मुफ्ती सय्यद अश्रफ यांनी केली.
या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता. राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, सरचिटणीस रवींद्र पालव, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, परिवहन सदस्य नितीन पाटील, कैलाश हावले, मुफ्ती अशारफ, गजानन चौधरी, विनोद उतेकर, दिलीप नाईक, अजित सावंत, संजीव दत्ता, शिवाकालू सिंग, आसद चाऊस, नारायण उतेकर, हुसेन मणियार, विधानसभा कार्याध्यक्ष विक्रांत घाग, महेंद्र पवार, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, अजय सकपाल, रत्नेश दुबे, निलेश फडतरे, प्रभाग अध्यक्ष शंकर पावणे, वार्ड अध्यक्ष हिरेन पांचाळ,दिनेश सोनकांबळे, रोहित चापले, संतोष घोणे व इतर सर्व प्रमुख पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 19 December 2021#FastNews #News #Headlinehttps://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/gY6mVehqZ8
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी; सदीप देशपांडेंचा थेट कानडीतून इशारा
देशाच्या देवांचा अपमान होतो तरीही चंपा असो की डंफा कोणीच बोलत नाही; अरविंद सावंत यांचा घणाघाती हल्ला