Malnutrition : कुपोषण मुक्तीसाठी ‘बाळ कोपरा’, महिला व बाल विकास विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

ठाणे जिल्हा परिषदेचा महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारीत ग्रामीण व आदिवासी भागामधील 9 प्रकल्पातंर्गत एकूण 1,894 केंद्रामध्ये 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील 1,31,307 मुले योजनेचा लाभ घेतात.

Malnutrition : कुपोषण मुक्तीसाठी ‘बाळ कोपरा’, महिला व बाल विकास विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
कुपोषण मुक्तीसाठी ‘बाळ कोपरा’Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 12:55 AM

ठाणे : ग्रामीण भागातील कुपोषणा (Malnutrition)ला आळा घालण्यासाठी शासनाच्या विविध योजनांसह ठाणे जिल्हा परिषद (Thane Zilla Parishad) नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची संकल्पनेनुसार या आर्थिक वर्षात महिला व बाल विकास विभागा (Women and Child Development Department)च्या माध्यमातून अंगणवाडीतील कुपोषित बालकांसाठी ‘बाळ कोपरा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत एक कोपरा तयार करून या कोपऱ्यात क्षार, जीवनसत्वे व सुक्ष्म पोषक तत्वे असणारे खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार आहे. हे खाद्यपदार्थ बालक स्वतःच्या हाताने खाऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या धोरणाला पूरक

केंद्र शासनाचे राष्ट्रीय पोषण मंडळ (Naional Nutrition Board (NNB) व Food & Nutrition Board (FNB) यांच्या अहवालानुसार वयोगटाप्रमाणे क्षार, जीवनसत्वे व सुक्ष्म पोषक तत्वे (Micronutrients) आहारातून मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना नियमित आहारा व्यतिरिक्त अतिरिक्त आहार उपलब्ध करून दिल्यास त्यांना योग्य ती प्रथिने व उष्मांक (PROTINE & CALRIES ) मिळून त्यांचे कुपोषण दूर होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमात अंगणवाडीमध्ये बालकांना नाचणीयुक्त बिस्कीट, राजगिरा स्लाईस, बिस्किट, खोबरा मिक्स वडी आदी अतिरिक्त आहार देण्याचे प्रस्तावित आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचा महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारीत ग्रामीण व आदिवासी भागामधील 9 प्रकल्पातंर्गत एकूण 1,894 केंद्रामध्ये 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील 1,31,307 मुले योजनेचा लाभ घेतात. विभागातंर्गत 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालके व गरोदर स्तनदा माता यांना घरी नेऊन खाण्यायोग्य आहार THR (TAKE FOME RATION) देण्यात येते. तसेच 3 ते 6 वर्षे वयोगटातील अंगणवाडीतील बालकांना अंगणवाडीमध्ये गरम ताजा आहार देण्यात येतो. अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) संजय बागुल यांनी दिली. (New Scheme initiative of Women and Child Development Department for malnutrition)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.