दिल्ली-जेएनपीटी हायवेमुळे दिल्ली ते मुंबई अंतर 12 तास, मुंबई, ठाणे, कल्याणमधील वाहतूक कोंडी कमी होणार-गडकरी

दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या 12 तासात पार करता येणार, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे.

दिल्ली-जेएनपीटी हायवेमुळे दिल्ली ते मुंबई अंतर 12 तास, मुंबई, ठाणे, कल्याणमधील वाहतूक कोंडी कमी होणार-गडकरी
दिल्ली ते मुंबई 12 तासात- नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 10:49 PM

दिल्ली ते जेएनपीटी हायवेचे (Delhi-JNPT Highway) काम सध्या सुरु सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या 12 तासात पार करता येणार, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. तसेच हायवेमार्गे अवजड वाहने शहराच्या बाहेरुन मार्गस्थ होणार असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी होईल आणि त्यातबरोबर प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज व्यक्त केला. कल्याणच्या सुभेदार वाडा कट्ट्याच्या वतीने आयोजित स्वर्गीय नेते राम कापसे व्याख्यानमालेमध्ये नितीन गडकरी यांनी ऑनलाईन संवाद साधला. नितीन गडकरी यांनी उपस्थिताना वाहतूक व्यवस्थेमध्ये होणाऱ्या बदलाबाबत माहिती दिली . यावेळी संवाद साधताना गडकरी यांनी मुबंई नजीक नवी मुंबई विमानतळ येथे विमानतळ होतंय, त्या दृष्टीने वॉटर टॅक्सी हा प्रकल्प तयार केला आहे. दक्षिण मुंबईतील लोकांनी बीपीटीत यायचे आणि आठ सीटर वॉटर टॅक्सीत बसले तर 13 मिनिटात नवी मुंबई एअरपोर्ट गाठत येणार आहे. त्या एअरपोर्टवरुन ठाणे, कल्याणला ही वॉटर टॅक्सीने जोडता येईल असे सांगितलं.

देशाला पुढे नेण्यासाठी उद्योग आणि शेती अधिक विकसीत करावी लागेल, त्यासाठी पाणी, इंधन, वाहतूकीची साधणे आणि कम्युनिकेशन यात नवनवे प्रयोग करावे लागतील. असे मतही गडकरींनी मांडले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपेक्षा जलवाहतुकीचा खर्च कमी आहे. ग्रीन इंधन तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. तसेच शेतकऱ्याचा फायदा होईल. एलएनजी, सीएनजी इंधनावर चालणारी वाहने तयार करण्यासाठी विविध कंपन्या पुढे येत आहेत. बायो एलएनजी, सीएनजी तयार करण्याच्या योजनेवर मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. असेही ते म्हणाले.

ईलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढवावा लागेल

ई वाहनाचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. ई वाहनामुळे प्रति किलोमीट प्रवास खर्च कमी होईल. ई हायवे आणि ग्रीन हायवे तयार केली जातील. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन वेळीच बचत होईल. तसेच लॉजीस्टीकवर होणारा खर्चाची बचत होण्यास मदत होईल. तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या सर्वागीण विकासासाठी काम केले पाहिजे असे गडकरी यांनी स्पष्ट केलंय. नागपूरच्या धर्तीवर रोड, त्याच्यावर ब्रीज, त्यावर मेट्रो असे बांधले असले तर रोड झाले असते. वेस्टर्न बायपास-इस्टर्न बायपासची कॅपॅसिटी डबल झाली असती. असेही ते म्हणाले.

Sharad Pawar : ‘योद्धा ये महान है’… कोरोनामुक्त शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खास शुभेच्छा!

Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्पही सर्वसामान्य नागरिकाला समर्पित असेल, देवेंद्र फडणवीसांचा दावा

भाजपच्या’ त्या’ 12 आमदारांना विधानभवनात प्रवेश मिळणार? आमदार आशिष शेलारांचं विधानभवन सचिवांना पत्र

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....