आजाराला कंटाळला, घरच्यांना त्रास नको म्हणून लोकलखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

आजारपणाला कंटाळून आत्महत्या करायला निघालेल्या एका 79 वर्षीय व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. (vithalwadi old age man suicide under local train)

आजाराला कंटाळला, घरच्यांना त्रास नको म्हणून लोकलखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
THANE LOCAL TRAIN SUICIDE
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 12:00 AM

ठाणे : आजारपणाला कंटाळून आत्महत्या करायला निघालेल्या एका 79 वर्षीय व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. मोटारमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे लोकलखाली येण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचा जीव वाचला. ही घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात शुक्रवारी (4 जून) घडली. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. (old age man tried to suicide under local train at Vithalwadi railway station Motorman saved him)

आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार आजारपणाला कंटाळून तसेच कुटुंबावर आपला भार नको म्हणून एक 79 वर्षीय वृद्ध व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते शुक्रवारी दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर पोहचले. यावेळी ते रेल्वेस्थानकावर काही वेळ थांबले. नंतर कल्याणकडून बदलापूर लोकल येताना पाहून त्यांनी रुळावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोटारमनने ऐनवेळी प्रसंगावधान दाखवले.  त्याने इमर्जन्सी ब्रेक दाबून लोकल जागेवर थांबवली.

पोलीस कर्मचाऱ्यांनी वृद्धाची समजूत काढली

यावेळी रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार खंडू व्हटकर आणि महिला पोलीस कर्मचारी गोंधळे यांनी तत्काळ या वृद्ध व्यक्तीला रेल्वे ट्रॅकजवळून बाहेर काढले. तसेच पोलिसांनी वृद्ध व्यक्तीची समजूत काढली.

मोटारमनचे सर्वत्र कौतुक

हा प्रकार घडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी आत्महत्या करायला निघालेल्या वृद्धाच्या मुलाशी संपर्क साधला. त्या मुलाला रेल्वेस्थानकात बोलावून आत्महत्या करण्यास निघालेल्या वृद्धाला सुखरूप घरी घेऊन जाण्यास सांगितले. या घटनेनंतर प्रसंगावधान दाखणाऱ्या मोटरमन राजन सी. आर. यांचं सर्वत्र कौतुक होतंय.

पाहा व्हिडीओ :

चोरी पकडली जाण्याच्या भीतीने चोराची थेट नदीत उडी

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात दुचाकी चोरी केल्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने चोराने थेट नदीत उडी मारल्याची घटना समोर आली आहे. उल्हानगरमध्ये हा सर्व फिल्मी प्रकार पाहायला मिळाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओही समोर आला. या चोराला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय.

उल्हासनगरातून दोन दुचाकी चोरांनी एका दुचाकीची चोरी केली. चोरलेल्या दुचाकीचे मालक दुसऱ्या गाडीवरुन या चोरट्यांचा पाठलाग करत होते. हे चोरटे अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या जवळ असलेल्या साईबाबा मंदिराजवळ आले. त्यावेळी त्या चोरांची गाडी स्लिप झाली. यावेळी एक चोरटा पळून गेला. तर दुसऱ्याने पळत जाऊन थेट वालधुनी नदीत उडी मारली. मात्र नंतर या चोराला पकडण्यात आले.

इतर बातम्या :

1.25 लाख द्या, मगच मृतदेह घेऊन जा, खासगी रुग्णालयाची दादागिरी, शिवसेनेच्या माजी आमदाराचा दणका

‘त्या’ विद्यार्थ्यांचा कॅनडा, अमेरिका, जपानला शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा; ठाणे पालिकेचं ‘वॉक इन’ लसीकरण

VIDEO : उल्हानगरमधील फिल्मी थरार, चोरी पकडली जाण्याच्या भीतीने चोराची थेट नदीत उडी, व्हिडीओ व्हायरल

(old age man tried to suicide under local train at Vithalwadi railway station Motorman saved him)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.