Utsav 75 Thane : ठाण्यात प्रथमच ‘उत्सव 75 ठाणे’ महोत्सवाचे आयोजन,खाडीमार्गे कोळी बांधवांची होडी रॅली
तिरंग्याने सजलेल्या 40 होड्यांचा या रॅलीच सहभाग होता. विटावा येथून ही रॅली चेंदणी कोळीवाडा येथे पोहोचल्यावर कोळीबांधवांनी पारंपरिक कोळी नृत्य सादर करून आपला आनंद व्यक्त केला.
ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी (Amrit Festival) वर्षानिमित्त ठाणे महानगरपालिका व विविध संस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘उत्सव 75 ठाणे‘ (Utsav 75 Thane) महोत्सवाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाला कोळी (Koli) बांधवांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. पारंपारिक वेशभूषेत कोळीबांधवांनी विटावा खाडी ते चेंदणी कोळीवाडा खाडीपर्यंत आपल्या होड्या घेऊन रँली काढली होती.
ठाणे शहरात अशा पद्धतीच्या रँलीचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले होते. आगरी कोळी बांधव हे ठाण्याचे भुमीपुत्र. आजही विटावा, चेंदणी परिसरात कोळीवाडे आपले अस्तित्व टिकवून आहेत. या कोळीबांधवांना अमृतहोत्सवी वर्षांत सहभागी करून घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले होते.
पारंपरिक वेशभूषेत कोळीबांधवांसह महिलाही अतिशय उत्साहात सहभागी झाल्याचे दिसून आले. 250 हून अधिक स्त्री-पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. तिरंग्याने सजलेल्या 40 होड्यांचा या रॅलीच सहभाग होता. विटावा येथून ही रॅली चेंदणी कोळीवाडा येथे पोहोचल्यावर कोळीबांधवांनी पारंपरिक कोळी नृत्य सादर करून आपला आनंद व्यक्त केला.