Bhaynder Incident : भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, अनेक जण दबल्याची भीती

मुसळधार पावसामुळे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Bhaynder Incident : भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, अनेक जण दबल्याची भीती
भाईंदरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 1:38 PM

भाईंदर / 20 जुलै 2023 : मुसळधार पावसामुळे भाईंदरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अनेक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळच्या सुमारास नवकिर्ती प्रिमायसेस को. हॅा. सोसायटीत ही घटना घडली. इमारतीचा तळमजला आणि पहिल्या मजल्याचा पुढील भाग कोसळला आहे. घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ धाव घेत काही लोकांना बाहेर काढले आहे. अग्नीशमन दल, पोलीस पथक घटनास्थळी दाखरल असून, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु आहे.

इमारतीचा पुढचा भाग कोसळला

गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जीर्ण इमारतींना सर्वाधिक धोका असतो. असे असतानाही धोकादायक इमारतीत नागरिक वास्तव्य करतात. यामुळे अशा दुर्घटना घडतात. अशीच घटना भाईंदर पूर्वेला घडली आहे. स्टेशन समोर असलेल्या जुन्या इमारतीचा समोरील भाग सकाळच्या सुमारास कोसळला. या इमारतीत अनेक दुकाने आहेत. इमारतीखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

घटना घडताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरु केले. अग्नीशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. अग्नीशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ बचाव कार्या सुरु केले.

हे सुद्धा वाचा

महापालिकेने धोकादायक घोषित केले होते

मीरा भाईंदर महानगरपालिकेने या इमारतीला धोकादायक म्हणून आधीच नोटीस दिली होती. इमारतीच्या आत कोणीही राहत नाही, खाली काही दुकाने आहेत, ती सुरू होती. इमारतीखाली उभा असलेला एक रिक्षाचालकही या दुर्घटनेत जखमी झाला आहे. आणखी दोन जण जखमी झाले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.