Thane: ठाण्यात शत प्रति शत एकनाथ शिंदे नाहीत? डोंबिवलीच्या शिवसेना शाखेतून शिंदे पिता पुत्रांचे फोटो हटवले!
श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक करत मोडतोड केली होती. आता डोंबिवलीतील शिवसेना शाखेतून एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढण्यात आले. यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये वाद निर्माण झालायं. घडलेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी देखील काही भाष्य करण्यास नकार दिलायं.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात घडामोडींना प्रचंड वेग आलायं. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत गुवाहटी येथे आहेत. मात्र, राज्याचे राजकारण (Politics) तापले आहे. डोंबिवलीच्या शिवसेना शाखेमध्ये एक धक्कादायक घटना घडलीयं. डोंबिवलीतील शिवसेना शाखेतून एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे या दोघांचे देखील फोटो (Photo) काढल्याचा प्रकार उघडकीस आलायं. शिंदे पिता पुत्रांचे फोटो हटवल्यानंतर पदाधिकारी आणि समर्थक यांच्यामध्ये वाद बघायला मिळतो आहे.
पदाधिकारी आणि समर्थक यांच्यामध्ये वाद
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. 8 मंत्र्यासह एकूण 51 आमदारांना घेऊन शिंदे यांनी बंड केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या या बंडामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आहे. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना चर्चेसाठी दारे खुली असल्याचे सांगितले जातयं. आठ दिवसानंतरही हे बंड थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. एकनाथ शिंदे गट भाजपासोबत सत्तास्थापन करणार असल्याचे स्पष्ट आहे. आज देवेंद्र फडणवीस दिल्ली दाैऱ्यावर आहेत, राज्यातील राजकिय स्थितीमध्ये फडणवीसांचा हा दाैरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय.
घडलेल्या प्रकरणावर पोलिसांची चुप्पी
श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक करत मोडतोड केली होती. आता डोंबिवलीतील शिवसेना शाखेतून एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढण्यात आले. यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये वाद निर्माण झालायं. घडलेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी देखील काही भाष्य करण्यास नकार दिलायं. शिंदे पिता पुत्रांचे फोटो कोणी हटवले असा सवाल उपस्थित केला जातोयं. शाखेत झालेल्या वादाची चर्चा आता रंगतांना दिसते आहे.