Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले ओबीसी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

गुरुवारी ओबीसी एकीकरण समितीने राष्ट्रपतींना पत्र पाठवून कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांना राज्यपाल पदावरून पायउतार करावे, अशी मागणी केली आहे. त्यातच ते आज ठाण्यात येत असल्याने त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची तयारी ओबीसी कार्यकर्त्यांनी केली होती.

राज्यपालांविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले ओबीसी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
राज्यपालांविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले ओबीसी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 12:23 AM

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांच्या ठाणे दौर्‍यादरम्यान निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्या विरोधात विविध संघटनांनी आंदोलनाचे इशारे दिले आहेत. गुरुवारी ओबीसी एकीकरण समितीने राष्ट्रपतींना पत्र पाठवून कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांना राज्यपाल पदावरून पायउतार करावे, अशी मागणी केली आहे. त्यातच ते आज ठाण्यात येत असल्याने त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची तयारी ओबीसी कार्यकर्त्यांनी केली होती. (Police arrest OBC activists in protest against governor)

मात्र, आंदोलनाच्या आधीच ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, रिपाई एकतावादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, काँग्रेस ओबीसी सेलचे ठाणे शहर अध्यक्ष राहुल पिंगळे, पप्पू मोमीन, अभिषेक पुसाळकर यांना ठाणेनगर तर राज राजापूरकर यांना कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्यपाल मुंबईला रवाना झाल्यानंतर या सर्वांची सुटका करण्यात आली.

राज्यपाल मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यावर सुटका

ठाणे नगर पोलिसांनी obc समाजाच्या काही आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राज्यपाल मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर 5 ते 6 जणांची सुटका करण्यात आली. राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावर जोपर्यंत महाराष्ट्रची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही राज्यपाल यांचा निषेध करत आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

राज्यपालांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडकडूनही निषेध

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले बेताल वक्तव्य केले होते. दरम्यान त्यांची पाठराखण करणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यामुळं संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीने स्थानिक पुसद नाका परिसरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (Police arrest OBC activists in protest against governor)

इतर बातम्या

Special Lecture Series : चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन

TMC Corporator : ठाणे महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपला, उद्यापासून प्रशासकीय राजवट सुरू

टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान.