Dombivali Murder : डोंबिवलीत एका टोपीवरुन लावला हत्येचा छडा, आरोपी 22 तासात पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे मैदनात काल दुपारच्या सुमारास एक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मयत इसम हा फिरस्ता होता. कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे त्याची हत्या का व कुणी केली याचा तपास करत आरोपीपर्यंत पोहचण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले होते. मृतदेहाच्या डोक्यावर लाकडी फळीने मारल्याच्या खुणा होत्या. विष्णुनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Dombivali Murder : डोंबिवलीत एका टोपीवरुन लावला हत्येचा छडा, आरोपी 22 तासात पोलिसांच्या ताब्यात
डोंबिवलीत एका टोपीवरुन लावला हत्येचा छडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 9:58 PM

डोंबिवली : काहीच पुरावा नसताना घटनास्थळी आढळलेल्या एका टोपीवरून विष्णुनगर पोलिसांनी हत्ये (Murder)चा अवघ्या 22 तासात उलगडा करत आरोपीला बेड्या (Arrest) ठोकल्या. काल दुपारच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे मैदानात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या इसमाचा डोक्यावर लाकडी फळीने मारल्याच्या खुणा होत्या. विष्णुनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत घटनास्थळी आढळलेल्या टोपी (Cap)च्या आधारे तपास सुरू केला. अवघ्या 22 तासात पोलिसांनी आधी टोपीचा मालक शोधला. नंतर त्याच्याकडे चौकशी करत त्याला बेड्या ठोकल्या. अर्जुन मोरे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मयत आणि आरोपी दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. मैदानात दारू पीत असताना झालेल्या वादातून ही घडली. दरम्यान अद्याप मयत इसमाची ओळख पटली नसून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे टोपीवाल्याचा शोध घेत आरोपीला पकडले

डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे मैदनात काल दुपारच्या सुमारास एक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मयत इसम हा फिरस्ता होता. कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे त्याची हत्या का व कुणी केली याचा तपास करत आरोपीपर्यंत पोहचण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले होते. मृतदेहाच्या डोक्यावर लाकडी फळीने मारल्याच्या खुणा होत्या. विष्णुनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासा दरम्यान घटनास्थळी मिळालेल्या टोपीच्या आधारे विष्णुनगर पोलिसांनी तपास सुरू करत टोपीच्या मालकाचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमरामध्ये टोपी घातलेल्या इसमाचा शोध घेत खबऱ्यांनी दिलेली माहितीनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ही हत्या केलेल्या इसमाचे वर्णन सांगितलं.

पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी मुसक्या आवळल्या

या प्रकरणात मयत इसम व आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते. दोघेही मिळेल ते काम करत उदरनिर्वाह करत होते. रात्री या मैदानात दारु पिण्यासाठी बसायचे इतकीच त्यांची ओळख होती. त्यामुळे आता या आरोपीला शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. पोलिसांनी पुन्हा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि खबऱ्यांकडून माहिती घेतली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हत्या करणारा अर्जुन मोरे याची ओळख पटवत त्याला डोंबिवलीमधून काही तासातच बेड्या ठोकल्या. अर्जुन मोरे याला पोलीस आपल्या मार्गावर असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे तो कोल्हापूरला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. पोलिसांनी आरोपीला जरी अटक केलं असलं तरी आता मयत इसमाची ओळख पटवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मयताची ओळख पटवण्यासाठी 3 विविध टीम बनवून शोध सुरू केला आहे. (Police have arrested the accused in the murder case of an unidentified person in Dombivali)

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.