ठाणे नगर पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात प्रदीप शर्मानी जामीनअर्ज घेतला मागे

ठाण्याच्या ठाणेनगर पोलीस ठाण्यात 30 जुलै रोजी ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि चकमक फेम प्रदीप शर्मा यांच्या टीमसह तब्बल 28 जणांवर खंडणी, धमकावणे यासह विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता.

ठाणे नगर पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात प्रदीप शर्मानी जामीनअर्ज घेतला मागे
ठाणे नगर पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात प्रदीप शर्मानी जामीनअर्ज घेतला मागे
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 9:20 PM

ठाणे : ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालेले तीन आरोपी प्रदीप शर्मा, सुनील देसाई आणि विकास दाभाडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सेशन न्यायालयात अर्ज केला होता. दरम्यान विकास दाभाडे याने अर्ज मागे घेतल्यानंतर चकमक फेम प्रदीप शर्मा यांनीही कुठलेही कारण न देता जमीनअर्ज मागे घेतला. तर याच प्रकरणातील सुनील देसाई यांचे वकील गैरहजर राहिल्याने त्यांच्या अर्जावर 19 ऑगस्ट रोजी सुनावणी करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. तर दुसरीकडे आरोपी विमल अगरवाल हे CCTV मध्ये नाचत असतानाचा विडिओ समोर आल्याने आरोपी मोकाट असून यामुळे फिर्यादी केतन तना याच्या कुटुंबीय भीतीच्या वातावरणात असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. (Pradip Sharma withdraws bail application in Thane Nagar Police Station ransom case)

सुनील देसाईंच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली

ठाण्याच्या ठाणेनगर पोलीस ठाण्यात 30 जुलै रोजी ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि चकमक फेम प्रदीप शर्मा यांच्या टीमसह तब्बल 28 जणांवर खंडणी, धमकावणे यासह विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता. या 28 जणांपैकी तिघांनी ठाणे सेशन न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तर सुनावणी पूर्वीच विकास दाभाडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. तर सोमवारी 9 ऑगस्ट रोजी चकमक फेम प्रदीप शर्मा यांनी कुठलेही कारण न देता जमीन अर्ज मागे घेतला. तर न्यायालयात आज सुनील देसाई यांच्या जमीन अर्जावर असलेली नियोजित सुनावणी होणार होती. मात्र देसाई यांचे वकील गैरहजर राहिल्याने सुनावणी न्यायालयाने पुढे 19 ऑगस्ट रोजी ढकलली. तसेच तक्रारदाराचे कुटुंब दहशतीच्या सावटाखाली असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.

गुन्ह्यात पोलीस अधिकारीसह 28 जणांचा समावेश

दरम्यान ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात 28 जणांचा समावेश असून यात पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत एकही आरोपीला अटक न झाल्याने तक्रारदार हे दहशतीच्या सावटाखाली आहेत. याच गुन्ह्यातील आरोपी विमल अग्रवाल हा पार्किंगमध्ये नाचत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या गुन्ह्यात असलेल्यांकडे अजूनही शस्त्र आहेत. त्यामुळे तक्रारदार धास्तावलेले असल्याचे तक्रारदारांचे वकील सागर कदम यांनी सांगितले. (Pradip Sharma withdraws bail application in Thane Nagar Police Station ransom case)

इतर बातम्या

“ठऱलेल्या फॉर्म्यूल्यानुसारच सगळं होणार”, माणिकरावांच्या तक्रारीनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केलेल्या नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार, संभाजीराजेंची घोषणा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.