अनिल परब यांच्या विरोधात भाजप आक्रमक; प्रताप सरनाईकांना विचारताच म्हणाले, मी स्वत:च अडचणीत
परिवहन मंत्री अनिल परब हे पोलिसांशी बोलत असल्याची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर परब यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. (pratap sarnaik no reaction on bjp's allegations to anil parab )
ठाणे: परिवहन मंत्री अनिल परब हे पोलिसांशी बोलत असल्याची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर परब यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. परब यांना कोर्टात खेचण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना विचारताच, मी स्वत: अडचणीत आहे, अशी हसून प्रतिक्रिया देत त्यांनी अधिक बोलणं टाळलं. (pratap sarnaik no reaction on bjp’s allegations to anil parab )
दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रताप सरनाईक आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन कार्डियाक रुग्णवाहिका, दोन ब्लड डोनेशन व्हॅन, एक कर्करोग निदान व्हॅन, शीतपेटीसह दोन मोक्षरथांचे लोकार्पण करण्यात आले. ठाणेकरांना 24 तास ही सुविधा देण्यात येणार आहे. यावेळी प्रताप सरनाईक बोलत होते. कोरोनाचे भान ठेवून दही हंडीवर पैसा खर्च न करता या ठिकाणी ही सुविधा देण्यात आलेली आहे.
कोरोना नियमांचे पालन करणार
यावेळी त्यांनी दही हंडीवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप आणि मनसेला सणानिमित्त आंदोलन करायचे आहे. त्यांना या निमित्ताने विरोध करायचा आहे, तसं असेल तर त्यांना लख लाभ असो. परंतु, आम्ही सणाच्या काळात कोरोना नियमांचे 100 टक्के पालन करणार आहोत. जिल्ह्यात आरोग्यदाई कार्यक्रम घेणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
शिवसेनेने करून दाखवलं
यावेळी त्यांनी नारायण राणेंवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना काय आहे आणि काय करू शकते हे सेनेने दाखवून दिले आहे. शिवसैनिक हा मुळातच आक्रमक आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची संयमी मुख्यमंत्री म्हणून देशात तुलना केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांचे इंदिरा गांधी यांच्या बाबत देखील वाद होते. राजीव गांधी, शरद पवार इतर राजकीय नेत्यांबरोबर त्यांनी राजकीय संघर्ष केला. पण त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती देखील टिकवली. त्यामुळे मोठ्या मोठ्या नेत्यांनी त्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. (pratap sarnaik no reaction on bjp’s allegations to anil parab )
100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 26 July 2021 https://t.co/f9lqxn4AoF #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 26, 2021
संबंधित बातम्या:
भाजपचा एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध, मग कोणती पद्धत हवी?; गिरीश बापटांनी केलं मोठं विधान
करारा जवाब मिलेगा पर तारीख नही बताऐंगे, नितेश राणेंचा शिवसेनेला धमकीवजा इशारा
(pratap sarnaik no reaction on bjp’s allegations to anil parab )