Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कल्याण-डोंबिवलीच्या 7 मोठ्या बीओटी प्रकल्प नुकसानीची तातडीने चौकशी करा’, प्रविण दरेकरांची मागणी

कल्याण-डोंबिवलीच्या 7 मोठ्या बीओटी प्रकल्प नुकसानीची तातडीने चौकशी करा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलीय.

'कल्याण-डोंबिवलीच्या 7 मोठ्या बीओटी प्रकल्प नुकसानीची तातडीने चौकशी करा', प्रविण दरेकरांची मागणी
pravin darekar
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 8:15 PM

डोंबिवली : “कल्याण डोबिंवली महापालिकेत सन 2005 ते 2008 दरम्यानच्या काळात 7 मोठे बीओटी प्रकल्प मंजूर करण्यात आले. पण यामधील एकही प्रकल्प अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. या प्रकल्पांची चौकशी झाली. यामध्ये मोठे नुकसान झाल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढला होता. तसेच या प्रकरणात 24 अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. परंतु सत्ताधाऱ्यांनी ही चौकशीची फाईल लाल फितीत अडकून ठेवली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी,” अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. ते आज (11 जुलै) डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलते होते (Pravin Darekar criticize Shivsena over Kalyan Dombivali development issue and BOT project).

प्रविण दरेकर म्हणाले, “कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कल्याण स्पोर्ट्स क्लब, सावळाराम महाराज क्रीडा व व्यापारी संकुल, आधारवाडी व्यापारी संकुल, लाल चौकी समाजमंदिर व व्यापारी संकुल, रुक्मिणीबाई पुनर्विकास व्यापारी संकुल, विठ्ठलवाडी मंडई व पार्किंग मॉल, दुर्गाडी पार्किंग संकुल असे 7 मोठे प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची चौकशी करण्यात यावी. या प्रकल्पांमधील एकही प्रकल्प गेल्या 15 वर्षात पूर्ण झालेला नाही. कल्याण- डोंबिवलीच्या विकासाच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. हे प्रकल्प गेली काही वर्षे रखडल्यामुळे कल्याणकरांना विकासासाठी वाट पाहवी लागत आहे. त्यामुळे हे रखडलेले प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत.”

“राज्यापासून कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता, तरीही परिस्थितीत सुधारणा नाही”

“राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, नगरविकास मंत्री ठाण्यातील आहे, ठाण्यात शिवसेनेचे मंत्री व पालकमंत्री आहेत. कल्याणमध्ये शिवसेनेचा खासदार व आमदार आहेत. महापालिकेमध्येही शिवसेनेची सत्ता आहे, पण एवढे सगळे असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि समन्वया अभावी कल्याण डोंबिवलीची परिस्थिती सुधारलेली नाही. या भागाचा विकास अद्यापही झालेला नाही. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत,” अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली. “कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घरे व आस्थापनांच्या माध्यमातून कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणारे दर अथवा उपयोगकर्ता शुल्क तात्काळ दर रद्द करावेत,” अशीही मागणी दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली.

कचरा संकलनासाठी पालिकेकडून वार्षिक 600 रुपये, तर व्यापाऱ्यांकडून 1800 रुपयांची आकारणी

“कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचरा संकलनासाठी नव्याने रहिवाशांना वार्षिक 600 रुपये प्रति घर तर व्यापारी वर्गाला वार्षिक 1800 अवाजवी कर भरावा लागत आहे. कोरोना संकट काळात नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झालीय. यातच अवाजवी कर आकारण्यात येत आहे. हा कर रद्द करावा किंवा कमी करावा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केलीय.

“फक्त केडीएमसीतच लस तुटवडा आहे का? लसीकरण झालेल्या लोकलने प्रवास करु द्या”

प्रविण दरेकर म्हणाले, “अन्य महापालिकेच्या तुलनेत येथील लसीकरण धीम्या गतीने सुरु आहे. गेले दोन आठवडे महापालिकेची लसीकरण केंद्र बंद आहेत. फक्त खासगी लसीकरण केंद्र सुरू आहेत. मग त्यांना लस कुठुन उपलब्ध होत आहे. फक्त केडीएमसीतच लस तुटवडा आहे का? केडीएमसीमध्ये कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर लसीकरण सूरू होणं मत्त्त्वाचं आहे. लवकरात लवकर हे लसीकरण सुरू करावे. ज्या नागरिकांच्या लसीचे दोन डोस झाले आहेत अशा नागरिकांना कर्जत ते ठाणे अशा रेल्वे प्रवासाची परवानगी देणे गरजेचे होते. कल्याण परिसरातून आपल्या उपजिविकेसाठी मुंबईला दरदिवशी प्रवास करणारे लाखो नागरिक आहेत.”

“रस्त्याने कामावर जाण्या येण्यास एकूण 4 ते 5 तास प्रवास करण्याची वेळ”

“उपनगरीय लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांसाठी बंद असल्यामुळे त्या नागरिकांना रस्त्याने कामावर जाण्या येण्यास एकूण 4 ते 5 तास प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे कल्याणकर हैराण झाले आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारची अनुकुलता असेल, तर मुंबईची रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार आहे,” अशी माहिती दरेकर यांनी दिली.

“महावितरणची अवाजवी बिले कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना येत आहे. सध्या कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. जे ग्राहक वीज बिल भरु शकत नाही, त्यांचीही वीज जोडणी सरसकट कापली जात आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची वीज न कापता त्यांना महावितरणने सवलत अथवा टप्प्या टप्यात वीज बिल भरण्याकरीता मुभा द्यावी,” अशी मागणी दरेकरांनी केली.

हेही वाचा :

खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, सर्वच तुमचे, लोकांची सेवा कधी करणार? प्रविण दरेकरांचा शिवसेनेला सवाल

‘महाविकास आघाडीबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात शंका’, ‘शिवसंपर्क’ अभियानावरुन प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

ईडीच्या चौकशीचा राजकारणाशी संबंध लावणे चुकीचे, खसडेंनी चौकशीला सामोरे जावे: प्रवीण दरेकर

व्हिडीओ पाहा :

Pravin Darekar criticize Shivsena over Kalyan Dombivali development issue and BOT project

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....