गिरीश महाजन यांनी अक्षरश: हात जोडले, तरीही आंदोलक आक्रमक, काय-काय घडलं?

गिरीश महाजन यांनी आरोपीला कायदेशीरपणे कठोरात कठोर कारवाई होईल, असं आवाहन आंदोलकांना केलं. तसेच आरोपीला आंदोलकांच्या हाती देवून मारुन टाकणं असा कोणताही कायदा नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. गिरीश महाजन यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्यासाठी अक्षरश: विनवण्या केल्या. पण आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिले.

गिरीश महाजन यांनी अक्षरश: हात जोडले, तरीही आंदोलक आक्रमक, काय-काय घडलं?
गिरीश महाजन यांनी अक्षरश: हात जोडले, तरीही आंदोलक आक्रमक
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 5:18 PM

बदलापूरच्या नामांकीत शाळेत एका सफाई कर्मचाऱ्याने दोन साडेतीन वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केला. संबंधित घटना या 13 आणि 14 ऑगस्टला घडल्या. या घटनेप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करुन घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे संपूर्ण बदलापुरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बदलापूरच्या नागरिकांनी आज बदलापूर बंदची हाक दिली. यानंतर आज सकाळी 9 वाजता बदलापूरकर थेट रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाचं संपूर्ण कामकाज बंद पाडलं. शेकडो नागरिकांचा जमाव रेल्वे स्थानकावर आला. आरोपीला आमच्या हातात द्या, त्याला आम्ही शिक्षा करु किंवा त्याला तातडीने फाशीची शिक्षा द्या, अशी भूमिका आंदोलकांची आहे. आंदोलकांचा रोष पाहता मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यांनी सलग दोन तास बदलापूरकरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आलं.

आंदोलकांचा रोष पाहता पोलिसांनी रेल्वे स्थानकावर गर्दी पांगवण्यासाठी आज दुपारी लाठीचार्ज करण्याचादेखील प्रयत्न केला. पण पोलिसांचा हा प्रयत्न आंदोलकांनी हाणून पाडला. आंदोलक हे रेल्वे रुळावर लाखोंच्या संख्येने असल्याने पोलिसांकडून लाठीचार्जचा प्रयत्न सुरु होताच आंदोलकांनी रेल्वे रुळावरील मोठमोठे दगड हातात घेऊन पोलिसांच्या दिशेला भिरकावले. यानंतर पोलिसांनी सामंजस्याने आंदोलकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले.

कुणाकुणावर कारवाई? महाजनांकडून आंदोलकांना माहिती

जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सरकारकडून मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या प्रकरणी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांन कारवाई करण्यास दिरंगाई केली त्यांचं निलंबन केल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

संबंधित शाळेच्या मुख्यधापिका, तसेच शाळेतील दोन सेविका यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. पीआयला निलंबित केलं आहे. या प्रकरणाचा खटला फास्ट्रट्रॅक कोर्टात चालवला जाईल, अशी माहिती देत गिरीश महाजन यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थित नाहीत. आरोपील्या आमच्या हवाली करा, अशी मागणी आंदोलकांनी गिरीश महाजन यांच्याकडे केली.

अखेर गिरीश महाजन यांना अपयश

यावेळी गिरीश महाजन यांनी आरोपीला कायदेशीरपणे कठोरात कठोर कारवाई होईल, असं आवाहन आंदोलकांना केलं. तसेच आरोपीला आंदोलकांच्या हाती देवून मारुन टाकणं असा कोणताही कायदा नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. गिरीश महाजन यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्यासाठी अक्षरश: विनवण्या केल्या. महिला, मुलं, रुग्ण, डॉक्टर हे या आंदोलनामुळे ट्रेनमध्ये रखडले आहेत. रेल्वे वाहतूक अशी ठप्प करुन चालणार नाही, असंही गिरीश महाजन म्हणाले. पण आंदोलक ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी अखेर गिरीश महाजन यांनी आंदोलकांसमोर हात जोडले. पण तरीही आंदोलकांनी ऐकून घेतलं नाही. जवळपास दोन तास गिरीश महाजन यांनी आंदोलकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. पण त्यात त्यांना अपयश आलं.

हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.