‘या ठिकाणी तुमची मुलगी असती तर?’, महिलेचा गिरीश महाजन यांना सवाल, बदलापूर रेल्वे स्थानकावर राडा

आंदोलकांचा आक्रोश पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. यावेळी एका महिलेने गिरीश महाजन यांना खोचक प्रश्न विचारला. या ठिकाणी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही शांत बसला असता का? असा सवाल महिलेने केला. 

'या ठिकाणी तुमची मुलगी असती तर?', महिलेचा गिरीश महाजन यांना सवाल, बदलापूर रेल्वे स्थानकावर राडा
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 4:45 PM

बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जातोय. बदलापूरच्या एका नामांकीत शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. संबंधित घटना या 13 आणि 14 ऑगस्टला घडल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास 12 तास उशिर केल्याचा आरोप केला जातोय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना इशारा दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे संपूर्ण बदलापुरात संताप व्यक्त केला जातोय. संतप्त आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर येत संपूर्ण रेल्वे स्थानक जाम केलं आहे. आंदोलकांनी गेल्या 8 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानक आणि रेल्वे सेवा ठप्प केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक बड्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आंदोलकांचा आक्रोश पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. यावेळी एका महिलेने गिरीश महाजन यांना खोचक प्रश्न विचारला. या ठिकाणी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही शांत बसला असता का? असा सवाल महिलेने केला.

“मुलगी कुणाचीही असो, असा कायदा आहे का आरोपीला लोकांच्या हवाल्यात देवून त्याला संपवून टाकावं? कुणाकडून काहीही बोललं गेलं तरी मला त्याचा राग नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचा राग हा बरोबर आहे. आरोपीला कठोरात कठोर कारवाई केली जाईल. तुम्ही आंदोलन मागे घ्या”, अशी विनंती गिरीश महाजन यांनी केली.

‘जोपर्यंत फाशीची शिक्षा लाईव्ह दिसत नाही….’

यावेळी आणखी एक महिला गिरीश महाजन यांच्याजवळ आली. या महिलेने आरोपीला इथे बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांच्या हाती द्यावं, अशी मागणी महिलेने केली. आरोपीला लाईव्ह फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महिलेने केली. चिमुरडींसोबत झालेला प्रकार किती भयानक आहे. त्या प्रकाराची आपण कल्पनादेखील करु शकत नाही. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी महिलेने केली.

हे सुद्धा वाचा

‘असा कुठला कायदा आहे का?’; गिरीश महाजनांचा आंदोलकांना सवाल

गिरीश महाजन यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची वारंवार विनंती केली. आरोपीला अशी रेल्वे स्थानकावर लोकांच्या स्वाधिन करुन मारुन टाकावं, असा कुठे कायदा आहे का? असं करुन ताई चालतं का? असा सवाल गिरीश महाजन यांनी केला. आरोपीवर कायदेशीररित्या योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.