VIDEO : कल्याणमध्ये गावगुंडांचा नंग्या तलवारी नाचवत धिंगाणा, आरोपींचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

कल्याण पूर्वेच्या म्हसोबा चौकातील प्रशांत बारजवळ बुधवारी रात्री 12 च्या सुमारास हा प्रकार घडला. नागेश दळवी आणि संदीप राठोड हे दोन गावगुंड या ठिकाणी हातात तलवारी घेऊन हैदोस घालत होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला थांबवून दमदाटी करत होते. त्यातच अजय शिरसाठ हा तरुण त्याच्या मित्रासोबत म्हसोबा चौकातून जात असताना या दोघांनी त्याला आवाज देऊन थांबवलं.

VIDEO : कल्याणमध्ये गावगुंडांचा नंग्या तलवारी नाचवत धिंगाणा, आरोपींचा हैदोस सीसीटीव्हीत कैद
कल्याणमध्ये गावगुंडांचा नंग्या तलवारी नाचवत धिंगाणाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 6:20 PM

कल्याण : कल्याणमध्ये दोन गावगुंडांनी भररस्त्यात नांग्या तलवारी (Swords) नाचवत धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेच्या म्हसोबा चौकात काल रात्री 12 च्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी एका तरुणावर जीवघेणा हल्लाही करण्यात आला. अजय शिरसाठ (26) असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या वादातून अजयला शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला केला. गावगुंडांचा हा हैदोस सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. नागेश दळवी आणि संदीप राठोड अशी या गावगुंडांची नावे आहेत. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Rada of goons with sword in hand in Kalyan, incident captured in cctv)

म्हसोबा चौकातील प्रशांत बारजवळ गावगुंडांचा हैदोस

कल्याण पूर्वेच्या म्हसोबा चौकातील प्रशांत बारजवळ बुधवारी रात्री 12 च्या सुमारास हा प्रकार घडला. नागेश दळवी आणि संदीप राठोड हे दोन गावगुंड या ठिकाणी हातात तलवारी घेऊन हैदोस घालत होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला थांबवून दमदाटी करत होते. त्यातच अजय शिरसाठ हा तरुण त्याच्या मित्रासोबत म्हसोबा चौकातून जात असताना या दोघांनी त्याला आवाज देऊन थांबवलं. जुन्या वादाच्या रागातून त्यांनी अजयला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संदिपने नागेशच्या हातातील तलवार घेऊन अजयच्या डोक्यावर वार केले. यात अजय जखमी झाला असून त्याला उपचारासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी नागेश आणि संदीप यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Rada of goons with sword in hand in Kalyan, incident captured in cctv)

इतर बातम्या

Solapur Murder : सोलापुरात क्षुल्लक कारणातून वादातून तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

Bhandara Accident: अज्ञात टिप्परने दुचकिला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.