धक्कादायक ! दिव्याच्या म्हात्रे वाडीतील 250 कुटुंबे तब्बल 12 तास पाण्यात

दिव्याच्या म्हात्रे वाडीतील 250 कुटुंबे तब्बल 12 तास पाण्यात होते, अशी माहिती आता समोर आली आहे.

धक्कादायक ! दिव्याच्या म्हात्रे वाडीतील 250 कुटुंबे तब्बल 12 तास पाण्यात
धक्कादायक ! दिव्याच्या म्हात्रे वाडीतील 250 कुटुंबे तब्बल 12 तास पाण्यात
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 5:43 PM

ठाणे : मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा कहर बघायला मिळतोय. दिवा पंचक्रोशीतील शिळ-कल्याण मार्गावरील म्हात्रे वाडीतील ब्रिटीशकालीन मोठा नाला बुजवल्यामुळे येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागात आज (18 जुलै) पहाटे दोन वाजता झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला. त्यामुळे या भागातील 250 कुटुंबांना तब्बल 12 तास पाण्यात रहावे लागले आहे. या नागरिकांवर येणारे हे संकट कायमचे दूर करण्यासाठी ठाणे पालिकेने एमएमआरडीए, एमआयडीसी, विपक्ष नेते, स्थानिक नगरसेवक आणि रहिवाशांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी ठाणे महापालिकेतील विरोधीपक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिळ-कल्याण मार्गावरील दिवा प्रभाग समितीअंतर्गत म्हात्रेवाडी ही अडीचशे घराची वसाहत आहे. या भागात एक ब्रिटीशकालीन ओढा होता. हा ओढा परिसरातील सर्व सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून नेत होता. मात्र, रस्ते बांधकाम प्राधिकरणाने या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करताना येथील मोरी आणि सबंध ओढाच बुजवून टाकला आहे. परिणामी जास्तीचा पाऊस झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे.

शानू पठाण यांची घटनास्थळाला भेट

रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अतिवृष्टी झाल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. हे पाणी येथील नागरिकांच्या घरात सुमारे बारा तासाहून अधिक काळ तुंबले होते. या ठिकाणी विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांनी भेट दिली.

‘प्रशासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई करावी’

प्रशासनाच्या म्हणजेच रस्ते प्राधिकरणाच्या चुकीमुळे ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे येथील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येथील पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, संयुक्त बैठक बोलावून ही समस्या कायमची निकाली काढावी, अशी मागणी शानू पठाण यांनी केली.

संबंधित बातम्या :

मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

वसई विरारमध्ये रात्रभर मुसळधार, रस्ते जलमय, जाधव पाड्यात 80 रहिवाशांची सुटका

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....