Raj Thackeray : “कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल!” मनसे आमदार राजू पाटलांचा खासदार संजय राऊत यांना टोला

राज ठाकरे यांनी पुण्यातून आपल्या अयोध्या दौऱ्याचीही घोषणा केली. मात्र राज ठाकरेंच्या या दौऱ्याला जोरदार विरोध झाला. त्यातच आज मनसेकडून अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्यावरून संजय राऊतांच्या टोलेबाजीला राजू पाटलांनी उत्तर दिलंय.

Raj Thackeray  : कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल! मनसे आमदार राजू पाटलांचा खासदार संजय राऊत यांना टोला
मनसे आमदार राजू पाटलांचा खासदार संजय राऊत यांना टोलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 5:26 PM

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नियोजित आयोध्या दौरा (Ayodhya Visit)) स्थगित करण्यात आला असून पुढे ढकलण्यात आला आहे. यावरून आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत मनसेला टोला लगावला होता. त्यांना आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा होती. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका उचलून तर धरलीच मात्र त्याचबरोबर मशीदीवरील भोंग्याविरोधात रणशिंग फुंकत हनुमान चालीसा चालवण्याची हाक दिली. त्यानंतर राज्यातलं वातावरण बरेज तापल्याचे दिसून आले. अशातच राज ठाकरे यांनी पुण्यातून आपल्या अयोध्या दौऱ्याचीही घोषणा केली. मात्र राज ठाकरेंच्या या दौऱ्याला जोरदार विरोध झाला. त्यातच आज मनसेकडून अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्यावरून संजय राऊतांच्या टोलेबाजीला राजू पाटलांनी उत्तर दिलंय.

काय म्हणाले राजू पाटील?

“पाच जूनसाठी राज ठाकरेंना काही सहकार्य हवं असतं, तर आम्ही केलं असतं. अयोध्या दौरा कशाला रद्द केला?” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला लगावला होता. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राऊत यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. आमदार राजू पाटील हे म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे दौरा रद्द झाला नाही, पुढे ढकलण्यात आला आहे. आणि आम्हाला यांची गरज नाहीये, त्यांना कदाचित दुःख वाटलं असेल, कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल. त्यांचं राजकारणाच हित साध्य झालं नसेल. पुन्हा एकदा यांना सुपारी द्यावी लागेल त्याचं दुःख वाटलं असेल. राज साहेबांच्या तब्येतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केला आहे. साहेब त्यांची भूमिका परवा स्पष्ट करणार आहेत, असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.

म्हणून ‘लोंढे’ एकटे जाऊ शकतात!

काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी “आम्ही आयोध्येला दर्शनासाठी जाणार आहोत, दौऱ्यासाठी नाही!” असं विधान यांनी केलं होतं. यावरही मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांच्या नावातच लोंढे आहे. त्यांना लोंढे घेऊन जायची गरज नाही, म्हणून ते एकटे जाऊ शकतात. त्यांनी कस जायचं, कसं नाही जायचं, त्यांचा विषय आहे”, असं राजू पाटील म्हणाले. हा दौरा स्थगित झाल्यावरून आता जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.