किती तो विरोधाभास? राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, शिंदे गटाचा उपनेता त्याच मंचावर

राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावक टीका करत होते. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे हे त्याच मंचावर बघायला मिळाले. त्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या. यावेळी शरद पोंक्षे यांनी आपली भूमिका मांडली. मी शिंदे गटात उपनेता केवळ नावाला असल्याचं शरद पोंक्षे यांनी स्पष्ट केलं.

किती तो विरोधाभास? राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, शिंदे गटाचा उपनेता त्याच मंचावर
राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, शिंदे गटाचा उपनेता त्याच मंचावर
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 9:23 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विशेष म्हणजे यात एक विरोधाभास बघायला मिळाला. राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावक टीका करत होते. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे हे त्याच मंचावर बघायला मिळाले. त्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या. यावेळी शरद पोंक्षे यांनी आपली भूमिका मांडली. मी शिंदे गटात उपनेता केवळ नावाला असल्याचं शरद पोंक्षे यांनी स्पष्ट केलं. पण एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे, शिंदेंच्याच होम ग्राउंडवर शिंदेंचा उपनेता मनसेच्या मंचावर बघायला मिळाला.

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी इथे आलो आहे. महाराष्ट्र विधानसभेची 2024 ची निवडूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. मी शिवसेना शिंदे गटाचा नावापुरता उपनेता आहे. मी अजूनही त्याच पक्षात आहे. पण राज ठाकरे यांचे विचार, राज ठाकरे यांची गेल्या 10 ते 12 वर्षांपासूनची आंदोलने हे सगळं पाहिल्यानंतर मला आतून सारखं असं वाटायला लागलं की, हा माणूस महाराष्ट्रच्या विधानसभेत आला पाहिजे”, अशी भूमिका शरद पोंक्षे यांनी मांडली.

शरद पोंक्षे काय-काय म्हणाले?

“महाराष्ट्राची महत्त्वाची निवडणूक आहे. राज ठाकरे हा माणूस विधानसभेत आला पाहिजे. आमदार सत्तेत दिसले पाहिजेत. कुठलीही निवडणूक हरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढायची असते. कोणाची रेषा पुसून नाही तर स्वात:ची रेषा काढायची असते. विचारसरणीच्या पायावरतीच मनसेचा जन्म झाला. महाराष्ट्राचं भलं व्हावं, हेवा वाटावा, असा महाराष्ट्र घडवावा, असं राज ठाकरेंच्या मनात आहे. ओठात एक आणि मनात एक असे नाही”, अशी भूमिका शरद पोंक्षे यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

“महाराष्ट्रमध्ये असे अनेक पक्ष आहेत. अ, ब, क, ड पैकी आम्ही अ आणि ब ला निवडून दिले. क आणि ड नोकोच होते. मात्र काही जण रुसून बसले. अ बरोबर ड एकत्र आले, अशी टीका शरद पोंक्षे यांनी केली. अविनाश जाधव दिवस-रात्र धावत असतो. सोन्यासारखा महाराष्ट्र घडवावा म्हणून इतके दिवस हा माणूस झगडत आहे”, असं शरद पोंक्षे म्हणाले.

“राजकीय लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करत आले. एकच राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज. आजारी पडलेल्या महराष्ट्राला असे चांगले 288 डॉक्टर विधानसभेत पाठवायचे आहे. राज ठाकरे त्यांच्या चष्मातून जात बघत नाहीत. सर्व साहित्यिक, संतांचा महाराष्ट्र घडवण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंकडे आहे. शिवसेना कोणालाही पक्षात घेऊ शकतात मग माझा निर्णय मी घेऊ शकतो. इंजिन जास्तीत जास्त धावेल, बुलेट ट्रेनची गरज पडायला नको. राज ठाकरेंना बळ द्या आणि इंजिनला शिक्का मारा”, असं आवाहन शरद पोंक्षे यांनी केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.