राज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर, तीन दिवस तळ ठोकणार; 9 मतदारसंघांचा घेणार आढावा

ठाण्याचा दौरा आटोपून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज संध्याकाळी ते पुण्यात पोहोचतील. (Raj Thackeray)

राज ठाकरे पुन्हा पुण्याच्या दौऱ्यावर, तीन दिवस तळ ठोकणार; 9 मतदारसंघांचा घेणार आढावा
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 3:51 PM

ठाणे: ठाण्याचा दौरा आटोपून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज संध्याकाळी ते पुण्यात पोहोचतील. तीन दिवसाच्या या दौऱ्यात ते एकूण 9 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. तसेच मनसे सैनिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या मार्गी लावणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने राज यांचा हा दौरा होत असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (Raj Thackeray Will Visit Pune For Three Days)

राज ठाकरे आज ठाण्यात आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून काही मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी ते पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तीन दिवस ते पुण्यात तळ ठोकून असणार आहेत. या तीन दिवसात ते नऊ मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

शाखाध्यक्षांच्या नियुक्त्या करणार

उद्या सकाळी 9 वाजता नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात ते शाखाध्यक्षांच्या मुलाखती घेणार आहेत. तसेच नवीन शाखाध्यक्षांच्या नियुक्त्या करणार आहेत. या दौऱ्यात ते एका दिवसात तीन मतदारसंघाचा आढावा म्हणजे तीन दिवसांत 9 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे पुण्यातील मनसे सैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शुक्रवारी शेवटचा आढावा घेऊन ते मुंबईला परतणार आहेत.

ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांना 8 सल्ले आणि सूचना

>> सोशल मीडियाचा वापर कमी करा >> स्थानिक पत्रकारांना धरून राहा. तुमच्या कार्यक्रमाची माहिती त्यांना द्या. असे कार्यक्रम करा की स्थानिक पत्रकार देखील तुमच्यावर खुश असतील >> प्रभाग अध्यक्षपद रद्द करण्यात येणार आहे. प्रभाग अध्यक्षपदी दुसरा पर्याय देण्यात येणार. पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात निवडणार >> 25 दिवसांनंतर ठाण्यात देखील प्रभाग अध्यक्षपदाला पर्याय देणार >> निवडणुकीच्या तयारीला लागा >> ठाणे महानगरपालिकेत 130 नगरसेवक आहेत. तेवढेच वार्ड, शाखाध्यक्ष मला पाहिजेत. शाखाध्यक्षांची संख्या जास्त वाढवत बसू नका. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे >> अजून एकमेकांशी हेवेदावे करू नका. एकमेकांशी जोडून राहा. पक्षबांधणी करा. नव्यांनी आणि जुन्यांनी एकमेकांशी वाद करू नका. मनसे पक्ष कसा बळकट होईल यासाठी विचार करा. त्याच्यासाठी मेहनत करा >> जे नवीन येतील, जे तिकिटासाठी येत असतील त्यांनी तिकीटासाठी येऊ नका. (Raj Thackeray Will Visit Pune For Three Days)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका : राज ठाकरे

जे पुण्यात, तेच ठाण्यात, तिकिटासाठी मनसेत येऊ नका, राज ठाकरेंच्या 8 महत्त्वाच्या सूचना

राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावं; शरद पवार म्हणाले…

(Raj Thackeray Will Visit Pune For Three Days)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.