कल्याणच्या 41 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, महिलांसाठी तब्बल 12 जागा राखीव
कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली (Reservation declare for Sarpancha post of Kalyan 41 Gram Panchayat).
ठाणे : कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याणचे तहसीलदार दिपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरक्षण सोडत जाहीर झाली. कल्याण तालुक्यातील 21 पैकी 20 ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवरीला निवडणूक पार पडली होती, तर एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यानंतर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडली होती. दरम्यान, आज झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमाती 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग 11 जागा आणि स्त्रियांकरता एकूण जागांपैकी 12 जागा राखीव अशा पद्धतीने आरक्षण काढण्यात आली आहे (Reservation declare for Sarpancha post of Kalyan 41 Gram Panchayat).
कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे :
अनुसूचित जाती :- गोवेली रेवती (अनुसूचित जाती, सर्वसाधारण), अनुसूचित जाती (स्त्री) :- (चिठ्ठी काढून) वरप, निंबवली मोस
अनुसूचित जमाती :- चौरे, कांबा, अनुसूचित जमाती (स्त्री) – म्हसकळ अनखळ
नागरिकांचा मागास प्रवर्ग:- गेरसे, रायते पिंपळोली
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री:- कुंदे, फळेगाव, आपटी मांजर्ली, नडगाव दानबाव, रायते पिंपळोली
नागरिकांचा मागास प्रवर्ग :- घोटसई, गेरसे, वेहळे, आणे भिसोळ, राया ओझर्ली, म्हारळ
सर्वसाधारण महिला :- गुरवली, पोई, वडवली शिरढोण, दहागाव, उशी आडावे, बेहरे, वासुंद्री, पळसोली, काकड पाडा, सांगोडे, उटणे चिंचवली, नवगाव बापसई, खोणी वडवली, मानिवली
सर्वसाधारण महिला :- उतने चिंचवली, पोई, पळसोली, मानिवली, सांगोडे कोंढेली, नवगाव बापसई, बेहरे, वासुंद्री, वडवली शिरढोण, रोहन अंतार्डे, उशिद अरेळे, खोणी वडवली
सर्वसाधारण:- दहीवली अडवली, गुरवली, वसद शेलवली, काकड पाडा, दहागाव, वाहोली, रुनदे आंबिवली, नांदप, मामनोली, कोसले, केळणी कोलम, जांभूळ मोहीली (Reservation declare for Sarpancha post of Kalyan 41 Gram Panchayat)
हेही वाचा : स्तुत्य ! कुष्ठरोग्यांच्या भल्यासाठी केडीएमसी आयुक्तांचं एक पाऊल पुढे, कुष्ठरोगी महिलांना रोजगार देणार