Ambernath Lift Collapse : अंबरनाथमध्ये दुसऱ्या माळ्यावरून लिफ्ट कोसळून सात महिला जखमी, दोघींचे पाय मोडले

इमारतीत सोमवारी काही महिला दुसऱ्या मजल्यावरील एका घरी डान्सच्या प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या. तिथून सायंकाळी पाचच्या दरम्यान परतत असताना लिफ्टमध्ये सात महिला शिरल्या. यावेळी लिफ्ट अतिशय वेगात खाली येऊन कोसळली. कोसळणाऱ्या लिफ्टचा वेग इतका जास्त होता, की 2 महिलांचे पाय जागीच मोडले.

Ambernath Lift Collapse : अंबरनाथमध्ये दुसऱ्या माळ्यावरून लिफ्ट कोसळून सात महिला जखमी, दोघींचे पाय मोडले
अंबरनाथमध्ये दुसऱ्या माळ्यावरून लिफ्ट कोसळून सात महिला जखमी
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 6:39 PM

अंबरनाथ : ओव्हरलोड झाल्याने दुसऱ्या माळ्यावरुन लिफ्ट (Lift) कोसळून सात महिला जखमी (Injured) झाल्याची घटना अंबरनाथमधील निलयोग नगरमध्ये घडली आहे. या महिलांपैकी दोघींच्या पायाला गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे तर इतर महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. विद्या सुर्वे आणि सुमन दास अशी गंभीर जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर सोसायटीतल्या रहिवाशांनी तिथे धाव घेत त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. (Seven women injured when elevator collapses from second garden in Ambernath)

दुसऱ्या मजल्यावर डान्स प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या महिला

इमारतीत सोमवारी काही महिला दुसऱ्या मजल्यावरील एका घरी डान्सच्या प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या. तिथून सायंकाळी पाचच्या दरम्यान परतत असताना लिफ्टमध्ये सात महिला शिरल्या. यावेळी लिफ्ट अतिशय वेगात खाली येऊन कोसळली. कोसळणाऱ्या लिफ्टचा वेग इतका जास्त होता, की 2 महिलांचे पाय जागीच मोडले. या घटनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्या सुर्वे आणि सुमन दास यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. दरम्यान, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी लिफ्टने गेल्यास किती महागात पडू शकतं, हे यावरून समोर आलंय.

ओव्हरलोड झाल्याने लिफ्ट कोसळून दुर्घटना

याबाबत या इमारतीचे विकासक ज्ञानधर मिश्रा यांना विचारले असता, ही इमारत अतिशय नवीन असून लिफ्ट खराब होण्याचे काही कारण नव्हते. मात्र लिफ्टमध्ये प्रमाणापेक्षा जास्त महिला शिरल्याने लिफ्ट कोसळल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत या महिलांना सोसायटीतील सदस्यांनी यापूर्वीही दोन वेळा समज दिली होती, मात्र तरीही क्षमतेपेक्षा जास्त महिला एकाच वेळी लिफ्टमध्ये गेल्याने हा अपघात झाल्याचे ते म्हणाले. तसेच ही इमारत आपण सोसायटीला हँडओव्हर केलेली असून सोसायटीकडून लिफ्टचे मेंटेनन्स सुद्धा केले जाते असल्याची माहिती त्यांनी दिली. (Seven women injured when elevator collapses from second garden in Ambernath)

इतर बातम्या

Chandrapur | कोळसा वसाहतीत गटार लाईनची स्वच्छता, 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू

Video: दो पेटी बहुत होते है साहब, उपरसे जो मेसेज आया वही फॉरवर्ड किया, सोलापूर पोलीसांच्या वसुलीचं Sting Operation

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.