महेश गायकवाड यांची तब्येत खालावली, डॉक्टरांची टीम घरी दाखल

महेश गायकवाड यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते आज तब्बल 24 दिवसांच्या उपाचारानंतर कल्याणमध्ये दाखल झाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पण महेश गायकवाड घरी दाखल झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आलीय.

महेश गायकवाड यांची तब्येत खालावली, डॉक्टरांची टीम घरी दाखल
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 9:10 PM

सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 26 फेब्रुवारी 2024 : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांना आज अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्यावर गेल्या 24 दिवसांपासून ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचं आज कल्याणमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. महेश गायकवाड त्यांच्या कार्यालयात आले तेव्हा त्यांच्या समर्थकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला चौक पासून ते वेगवेगळ्या चौकांमध्ये कार्यकर्त्यांकडून महेश गायकवाड यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी महेश गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यांनी सर्व कार्यकर्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. यानंतर महेश गायकवाड आपल्या राहत्या घरी दाखल झाले. पण त्यानंतर महेश गायकवाड यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली.

महेश गायकवाड आपल्या राहत्या घरी दाखल झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डॉक्टरांची एक टीम त्यांच्या घरी दाखल झाली आहे. महेश गायकवाड यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांकडून त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत. डॉक्टरांची टीम महेश गायकवाड यांची तपासणी करत आहे. महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या शरीरातून शस्त्रक्रिया करुन 6 गोळ्या काढण्यात आल्या आहेत.

‘गणपत गायकवाडांनी माझ्या व्यवसायात अडचणी निर्माण केल्या’

दरम्यान, महेश गायकवाड कल्याणमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “कल्याण पूर्व येथील विविध समस्यांचा पाठपुरावा मी करत होतो. प्रत्येक वेळेला आमदार गणपत गायकवाड अडचणी निर्माण करत होते. सामाजिक कामात नव्हे तर माझ्या व्यवसायात देखील त्यांनी माझ्या भागीदारांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यांनी प्रत्येकवेळी माझी समजूत काढली. युतीत आहे असं सांगण्यात आलं”, असं महेश गायकवाड म्हणाले.

“शेतकऱ्यांवर अन्याय झाला. मी विरोध केला म्हणून माझ्यावर गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाड 2019 मध्ये संधी साधून भाजपमध्ये आले. ते भाजपचे कार्यकर्ते नाहीत. भाजपचे हे संस्कार नाही. माझा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. आमदार गणपत गायकवाड यांना कठोर शिक्षा मिळेल. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या आईचे, गोरगरिबांचे आशीर्वाद आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे आज मी तुमच्यासमोर उभा आहे. इथून पुढे आणखी जोमाने समाजसेवा करेन”, अशी प्रतिक्रिया महेश गायकवाड यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.