AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या माजी आमदाराकडून भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्याला शुभेच्छा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कपिल पाटील यांच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. येत्या सोमवारी ठाण्यात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या माजी आमदाराकडून भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्याला शुभेच्छा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 11:10 PM

डोंबिवली : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार कपिल पाटील यांची थेट केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कपिल पाटील यांच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. येत्या सोमवारी ठाण्यात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून कपिल पाटील यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (ShivSena leader Subhash Bhoir congratulates BJP State Union Minister Kapil Patil using banner at kalyan)

भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण

कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा सोमवारी काढली जाणार आहे. प्रथमच आगरी समाजातील एखाद्या नेत्याला केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

सुभाष भोईर यांच्या बॅनरची सर्वत्र चर्चा

मात्र कल्याण शीळफाटा परिसरात लावलेल्या एका बॅनरमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांचे सुपूत्र सुमित भोईर यांनी हा बॅनर लावला आहे. यावर सुभाष भोईर आणि कपिल पाटील यांचा एकत्रित फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राजकीय क्षेत्रात खळबळ

सुभाष भोईर यांची 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात आली होती. त्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले होते. त्यामुळे सुभाष भोईर यांचा हा बॅनर शुभेच्छा देणारा आहे की, काही राजकीय संकेत देणारा, हे येत्या काळात उघड होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या काही नगरसेवकांकडून कपिल पाटील यांचे शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर बातम्या

काही लोक म्हणत असतील 75 वर्षात काहीच घडलं नाही, पण…; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा भाजपवर निशाणा

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव

(ShivSena leader Subhash Bhoir congratulates BJP State Union Minister Kapil Patil using banner at kalyan)

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.