कुणाला कितीही पोस्टर लावू द्या, कोण काम करतंय हे सगळ्यांनाच माहीत; श्रीकांत शिंदेंचा भाजपला टोला

कुणाला कितीही पोस्टर लावू द्या. त्याने काही फरक पडत नाही. (shrikant shinde slams bjp over poster war in kalyan-dombivali)

कुणाला कितीही पोस्टर लावू द्या, कोण काम करतंय हे सगळ्यांनाच माहीत; श्रीकांत शिंदेंचा भाजपला टोला
shrikant shinde
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 7:22 PM

अमजद खान, टीव्ही9 मराठी, कल्याण: कुणाला कितीही पोस्टर लावू द्या. त्याने काही फरक पडत नाही. काम कोण करत आहे आणि मदतीला कोण धावून जात आहे, हे सर्वांना माहीत आहे, असा टोला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना नाव न घेता लगावला. (shrikant shinde slams bjp over poster war in kalyan-dombivali)

कल्याण-डोंबिवली परिसरात भाजप आणि शिवसेनेत वाद सुरू आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांची पोस्टर बॉय आणि गल्ली बॉय म्हणून अवहेलना केली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी सवाल केला असता त्यांनी हा टोला लगावला. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली जीमखाना येथे पत्रकार परिषद घेऊन डोंबिवलीतील रस्ते कामाची माहितीही दिली. डोंबिवली निवासी आणि औद्योगिक विभागातील 35 किलोमीटरच्या रस्ते विकासाकरीता 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पोस्टर कोणीही लावू द्या, काम कोण करतंय हे लोकांना चांगलच माहीत आहे, असं सांगतानाच कल्याण-डोंबिवलीतील कामे आम्हीच करत राहणार, असा चिमटाही शिंदे यांनी काढला.

असा मिळणार निधी

डोंबिवली निवासी आणि औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यांची दुरुस्ती आणि काँक्रिटिकरण रखडले आहे. जानेवारी महिन्यात महामंडळाचे कार्यकारी अभियंता डॉ. पी. अनबलगन यांच्यासोबत बैठक पार पडली होती. महापालिका आणि महामंडळ रस्ते विकासासाठी प्रत्येकी 50 टक्के खर्च करणार आहे. महापालिकेने 40 टक्के रस्त्यासाठी निविदा काढल्यावर महामंडळाकडून 60 टक्के कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यानुसार महापालिका 55 कोटी 15 लाख रुपयांचा निधी महामंडळाकडे वर्ग करणार आहे. तसा प्रस्तावही महापालिकेने महासभेत यापूर्वीच मंजूर केला आहे. तर महामंडळाकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत 57 कोटी 37 लाख रुपये अनुदान स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

आम्ही केलेलं काम सर्वांसमोर

विकासाच्या दृ्ष्टीकोनात कल्याण लोकसभा मतदार संघातील नागरिकांना काय काय देता येईल त्याकडे आमचं लक्ष आहे. बाकी कोण काय करते यापेक्षा मी काय करतो यावर माझा जास्त भर असतो. पोस्टर कोणीही लावावेत काम झाल्याशी लोकाना मतलब असतो. आम्ही जे काम केले आहे. ते सर्वांसमोर आहे. हे 110 कोटीचे काम असेल, कोविड काळातील काम तसेच पत्री पूल, दुर्गाडी पूल ही कामे आम्ही केली आहेत, त्याची जनतेला जाणीव आहे, असंही ते म्हणाले. घनकचरा व्यवस्थापना संदर्भात भाजपने पोस्टरबाजी केली होती. त्यावर शिंदे यांनी पलटवार केला आहे. (shrikant shinde slams bjp over poster war in kalyan-dombivali)

संबंधित बातम्या:

केडीएमसीत पोस्टर बॉय विरुद्ध गल्ली बॉय; शिवसेना-भाजपमधील वाद पेटला

मुंडे साहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला एक स्वप्न पूर्ण, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे मंजूर: धनंजय मुंडे

‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही – देवेंद्र फडणवीस

(shrikant shinde slams bjp over poster war in kalyan-dombivali)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.