अनेक दिवसांपासून ग्राहकांची तुफान गर्दी, सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, कल्याणचा डी मार्ट पाच दिवसांसाठी सील
डी-मार्टच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय (six employees tested corona positive of Kalyan D mart).
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसाला 500 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. बाधितांचा आकडा वाढण्यामागे नागरिकांचा निष्काळजीपणा हे मुख्य कारण ठरलं आहे. कल्याणच्या डि-मार्टमध्ये लॉकडाऊन होईल या भीतीने दररोज शेकडो लोक तिथे प्रचंड गर्दी करायचे. पोलिसांकडून आणि महापालिका प्रशासनाकडून लोकांना समजवण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय डी-मार्टच्या प्रशासनालाही कडक ताकीद देण्यात आली होती. मात्र, अखेर ज्याची भीती होती ते घडलं. डी-मार्टच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय (six employees tested corona positive of Kalyan D mart).
डी-मार्ट पाच दिवसांसाठी सील
डी-मार्टीमधील कोरोना पॉझिटिव्ह आलेले कर्मचारी आतापर्यंत हजारो लोकांच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी डी-मार्टला गेलेल्या नागरिकांना प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर महापालिकेने डी-मार्ट पाच दिवसांसाठी सील केला आहे (six employees tested corona positive of Kalyan D mart).
110 पैकी 6 जण पॉझिटिव्ह, इतर क्वारंटाईन
कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही दिवसात जवळपास 3 हजार रुग्ण वाढले आहेत. याच पाश्वभूमीवर महापालिकेकडून व्यापारी आणि दुकानदारांची अॅन्टीजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे. कल्याणच्या बैल बजार येथील गजबजलेल्या डी-मार्टच्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 110 पैकी सहा कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे डी मार्ट पाच दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. तर अन्य कर्मचाऱ्याना क्वारंटाईन केले आहे. लॉकडाऊच्या भीतीपोटी या ठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी होत होती. पोलिसांनी कारवाई करुन सुद्धा डी-मार्टमध्ये लोक खरेदीसाठी जमत होते. आत्ता कर्मचारी कोरोना पॉझीटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात अन्य किती लोक याचा अंदाज बांधता येणार नाही.
कल्याणमध्ये दिवसभरात 565 कोरोना रुग्णांची नोंद
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात 565 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 203 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. कल्याणमधील कोरोनाबाधितांचा एकूण संख्या ही सध्या 68,706 रुग्ण आढळले. यापैकी 63,589 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 3826 रुग्णांवर उपचार सुरु आहे. याशिवाय आतापर्यंत 1191 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : अभिनेत्याकडून तब्बल 50 लाखाच्या नकली नोटा जप्त, पोलिसांकडून बेड्या, फिल्मी दुनियेत खळबळ