Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माफ करा… मी अस्वस्थ आहे… कुणालाही भेटू इच्छित नाही; भावनिक ट्विट करून जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी

या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच लकी ड्रॉमधून दोन विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि चार विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे.

माफ करा... मी अस्वस्थ आहे... कुणालाही भेटू इच्छित नाही; भावनिक ट्विट करून जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी
jitendra awhadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 9:54 AM

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 5 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे. आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाणे आणि मुंब्रा परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सकाळपासूनच त्यांना त्यांचे चाहते, हितचिंतक आणि कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी घरी येत असतात. पण यंदा जितेंद्र आव्हाड वाढदिवस साजरा करणार नाहीयेत. आव्हाड यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. माफ करा, मी अस्वस्थ आहे. मी कुणालाही भेटू इच्छित नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच मी अस्वस्थ असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांनी पहिल्यांदाच वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर भलं मोठं ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी मनाची अस्वस्थता बोलून दाखवली आहे. तसेच अजितदादा गटावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. आव्हाड यांच्या या ट्विटमागचा रोख अजितदादा गटावर असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

ठाण्यात कार्यक्रम

दरम्यान, आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आज “गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नितेश कराळे सर हे आपल्या खुमासदार शैलीत विद्यार्थ्यांना भावी आयुष्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि युवाध्यक्ष विक्रम खामकर यांनी दिली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच लकी ड्रॉमधून दोन विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि चार विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे.

आव्हाड यांचं ट्विट जसंच्या तसं…

5 ऑगस्ट… माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही.

देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही.

तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा. मी शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 12 पर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.

लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.