CCTV : उल्हासनगरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद, भरधाव टेम्पोनं दुचाकीवरच्या जोडीला बेधडक उडवलं, कमजोर दिलवाले ना देखे

कल्याण पश्चिम भागात राहणारे ललित कुमार सिंग हे 14 एप्रिल रोजी उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये पत्नीसह खरेदी करण्यासाठी आले होते. तिथून रात्री 10.30 च्या सुमारास ते सी ब्लॉक मार्गे घरी परतत असताना शहाड रेल्वे स्थानकाच्या चौकात एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ललितकुमार हे जागीच पडले, तर त्यांच्या पत्नीला टेम्पो चालकाने काही अंतरापर्यंत फरफटत नेलं.

CCTV : उल्हासनगरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद, भरधाव टेम्पोनं दुचाकीवरच्या जोडीला बेधडक उडवलं, कमजोर दिलवाले ना देखे
अकोल्यात ट्रॅकच्या धडकेने वृद्धाचा जागीच मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 6:57 PM

उल्हासनगर : एका भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 1 मधील शहाड रेल्वे स्थानक परिसरात 14 एप्रिल रोजी रात्री ही अपघाता (Accident)ची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. टेम्पोने धडक दिल्यानंतर ललितकुमार हे जागीच पडले तर त्यांच्या पत्नीला टेम्पो चालकाने काही अंतरापर्यंत फरफटत नेले. याप्रकरणी ललित कुमार सिंग यांच्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Speedy tempo hits couple in Ulhasnagar incident captured on CCTV)

टेम्पोने काही अंतरापर्यंत महिलेला फरफटत नेले

कल्याण पश्चिम भागात राहणारे ललित कुमार सिंग हे 14 एप्रिल रोजी उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये पत्नीसह खरेदी करण्यासाठी आले होते. तिथून रात्री 10.30 च्या सुमारास ते सी ब्लॉक मार्गे घरी परतत असताना शहाड रेल्वे स्थानकाच्या चौकात एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ललितकुमार हे जागीच पडले, तर त्यांच्या पत्नीला टेम्पो चालकाने काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. यानंतर आणखी दोन गाड्यांना या टेम्पो चालकाने धडक दिली. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीच्या वेळी टेम्पो चालकाने भरधाव टेम्पो चालवत दाम्पत्याला उडवल्याची ही घटना घडली. (Speedy tempo hits couple in Ulhasnagar incident captured on CCTV)

इतर बातम्या

Mumbai High Court : कामात अडथळा आणू नका!; इमारत पुनर्विकासासंबंधी मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल

PNB Scam : मेहुल चोक्सीच्या नाशिकातील मालमत्तांवर टाच; ‘आयकर’ची कारवाई

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.