Raj Thackeray Sabha : नुसती गाणी वाजवून चालणार नाहीये!’ ठाण्यातील उत्तरसभेत ‘राजगर्जने’आधी वसंत मोरे गरजले
ज्यावेळेस पुरस्कार देण्याची वेळ आली, तर 100 नगरसेवक भाजपचे. 10-10 नगरसेवक सेना आणि काँग्रेसचे आहेत. पण तरीही चर्चेतील चेहरा हा मनसेच्या नगरसेवकांना जातो. म्हणजेच काय तर आम्ही केलं. फक्त गाण्यापुरतं आपण मर्यादित राहणार आहे का आपण. नुसती गाणी वाजवून चालणार नाहीये, असे वसंत मोरे यावेळी म्हणाले.
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात उत्तर सभा होत आहे. यावेळी मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) विरोधकांवर गजरले. जसा कोरोनाचा ट्रेन्ड गेला तसं फायनान्स वाले, बँकावाले, सामान्यांच्या दारासमोर आले. अशा वेळी फक्त मनसेनं मदत केली. फायनान्सवाला दारात आला की मनसेवाला आठवतो. पैसे वसुलीवाला आला की मनसेवाला आठवतो. मग निवडणुकीच्या काळात मनसे का आठवत नाही? असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे. या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. आपण पोहोचत नाही आहोत. मी आणि साईनाथ आम्ही दोघांना पुणे कोंडव्यात काय केलंय, ते दाखवतो. ब्लू प्रिंट कुठे नेऊन ठेवली आहे, ते दाखवतो. येऊन बघा. आजही पुण्यात आम्ही दोघांनी काम केलं, ज्यावेळेस पुरस्कार देण्याची वेळ आली, तर 100 नगरसेवक भाजपचे. 10-10 नगरसेवक सेना आणि काँग्रेसचे आहेत. पण तरीही चर्चेतील चेहरा हा मनसेच्या नगरसेवकांना जातो. म्हणजेच काय तर आम्ही केलं. फक्त गाण्यापुरतं आपण मर्यादित राहणार आहे का आपण. नुसती गाणी वाजवून चालणार नाहीये, असे वसंत मोरे यावेळी म्हणाले. (Statement of MNS leader Vasant More on politics at Raj Thackerays meeting in Thane)
कोरोना काळात फक्ते मनसे पुण्यात काम करत होती
पुण्यात कोरोना काळात सरकारच्या माध्यमातून जी काम होणं अपेक्षित होतं ती कामं झाली नाहीत. त्यावेळी फक्त मनसे काम करत होती. तुम्ही त्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. सगळे नेते आपल्या घरात बसलेले असताना मनसे पदाधिकारी रस्त्यावर होते. एक एम्बेसेडरची काच फुटली आणि त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्राने ऐकला. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती तिथे आमचा मनसैनिक जात होता. सरकार जी कामं करत नव्हते ती कामं आम्ही करत होतो. आमचा साईनाथ 5 – 5 हजार लोकांना जेवण देत होता. आम्ही दवाखाने उभे केले.
राज साहेबांच्या तब्येतीच्या अडचणी
गेल्या दोन तीन महिन्यात राज साहेबांच्या तब्येत अडचणी सुरु आहेत. कालही त्यांना होणारा त्रास मला जाणवत होता. आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे की एक पायरी चढणं मुश्किल होतं तिथे ते 10 पायऱ्या चढून कार्यकर्त्याच्या घरी जात होते. राजसाहेबांच्या ब्लू प्रिंटचं काम पाहायलं असेल तर कात्रज आणि कोंढव्यात या. पुणे महापालिकेत आम्ही दोनच नगरसेवक आहोत. तरीही चर्चेतील चेहरा हा पुरस्कार मनसेच्या नगरसेवकाला जातो. म्हणजे मनसे नक्कीच चांगलं काम करत आहे. जवळजवळ वर्षभरापासून दोन तीन महिन्यांपासून त्यांच्या तब्येतीच्या अडचणी आहेत. कालही साहेबांना भेटलो तेव्हाही त्यांचा त्रास मला जाणवत होता. साहेब प्रत्येक शाखाप्रमुखाच्या घरात जात होते. जर साहेब हे सगळं करतात, तर आपण कार्यकर्ते कशाप्रकारे काम करतो.
चंद्रकांतदादांकडून भाजपची ऑफर
16 वर्षात 16 उद्यानं निर्माण करणारा मी एकमेव नगरसेवक आहे. मला पुरस्कार देताना चंद्रकांतदादा आणि सुप्रिया सुळे होत्या. तेव्हा चंद्रकांतदादा म्हणाले तुम्ही भाजपमध्ये या. तेव्हा मी दादांना म्हणालो मी 15 वर्षे भाजपच्याच उमेदवाराला पाडून नगरसेवक होत आलोय. (Statement of MNS leader Vasant More on politics at Raj Thackerays meeting in Thane)
इतर बातम्या