Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TDCB Election | संचालक असूनही तिकिटाला नकार, पठ्ठ्यानं बंड पुकारलं, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धूळ चारली

इंद्रजित पडवळ यांनी महाविकास आघाडीविरोधात बंड करत ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जिंकली आहे. (tdcb election indrajit padwal prakash varkute)

TDCB Election | संचालक असूनही तिकिटाला नकार, पठ्ठ्यानं बंड पुकारलं, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धूळ चारली
पडवळ यांनी दोन मतांनी निवडणूक जिंकली
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 4:29 PM

ठाणे : संचालकपदावर असूनसुद्धा उमेदवारी नाकारल्यामुळे शहापूरचे इंद्रजित पडवळ (Indrajit Padwal) यांनी महाविकास आघाडीविरोधात बंड करत ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रकाश वरकुटे (Prakash Varkute) यांना दोन मतांनी हरवले आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये अगदीच अटितटीची लढाई झाली. (TDCB election Thane District Central Co-operative Bank election Indrajit Padwal defeated Prakash Varkute by Two votes)

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 30 मार्च रोजी झाली. ही निवडणूक महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित लढवली. या निवडणुकीत 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले तर उरलेल्या 15 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली. यावेळी एकत्र लढल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अतिशय विचारपूर्वक तिकीट वाटप केले. यामध्ये बँकेच्या संचालकपदावर असूनसुद्धा इंद्रजित पडवळ यांना महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारली. मात्र तरीसुद्धा पडवळ यांनी बहुजन विकास आघाडीशी संधान बांधत प्रकाश वरकुटे यांना धूळ चारली.

बहुजन विकास आघाडीशी हातमिळणी

कैलास ( इंद्रजित ) पडवळ हे मागील 5 वर्षांपासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर आहेत. तरीसुद्धा पडवळ यांना उमेदवारी नाकारत आघाडीने प्रकाश वरकुटे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर थेट अपक्ष म्हणून निवडणूक न लढवता त्यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याशी हातमिळवणी करून सहकार पॅनेलमधून निवडणूक लढवली.

पडवळ-वरकुटे यांच्या अटितटीची लढाई

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 30 मार्च रोजी झाली. आज म्हणजेच 31 मार्च रोजी मतमोजणी झाली. इंद्रजित पडवळ आणि प्रकाश वरकुटे यांच्यामध्ये अटितटीची लढाई झाली. ही जागा जिंगण्यासाठी महाविकास आघाडीने चांगलाच जोर लावला होता. मात्र, आघाडीचे उमेदवाल प्रकाश वरकुटे यांचा दोन मतांनी पराभव झाला. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पडवळ यांनी जिंकली.

दरम्यान, उमेदवारी नाकारुनसुद्धा पडवळ यांनी आपल्या विजयाचे निशाष बँकेवर फडकावल्यामुळे महाविकास आघाडीला हा चांगलाच  झटका असल्याचे म्हटले जातेय. पडवळ यांच्या विजयासाठी मुरबडचे आमदार किसन कथोरे आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मोलाची भूमिका बजावली. जिल्हा बँकेच्या निडणुकीत एकूण जागांसाठी 46 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. 3062 मतदारांनी मतदान केले. त्यासाठी जिल्ह्यात एकूण 15 मतदान केंद्रांवर मतदान झालं.

इतर बातम्या :

‘महावसूली’ सरकारने 1 एप्रिलपूर्वीच जनतेला ‘एप्रिल फूल’ बनवलं, भाजपची खोचक टीका

87 वर्षीय माजी पंतप्रधानांना कोरोना, मोदींचा फोन, शहरात कोणत्याही रुग्णालयात उपचार घ्या

‘महाविकासआघाडीचे नेते फक्त पैसा कमवायच्या मागे, उद्धव ठाकरे कशातच लक्ष घालत नाहीत”

(TDCB election Thane District Central Co-operative Bank election Indrajit Padwal defeated Prakash Varkute by Two votes)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.