आता ठाण्यातील हॉस्पिटल्स, बेडस व्यवस्थेसह रुग्णवाहिकेची माहिती एकाच क्रमांकावर
ओमिक्रॉन व्हेरियंट व कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता शहरात उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती तात्काळ मिळण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
ठाणे: ओमिक्रॉन व्हेरियंट व कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता शहरात उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती तात्काळ मिळण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी +91 73063 30330 या वॅार रूमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड वॉर रूमने अधिक प्रभावीपणे काम केले आहे. सध्यस्थितीत ओमिक्रॉन व्हेरियंट व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड वॉर रूम अधिक सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. वॉर रूमच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी +91 73063 30330 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.
22 क्रमांक जोडले
वॉर रूममध्ये +91 73063 30330 या क्रमांकाशी इतर 22 संपर्क क्रमांक जोडण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता संपर्क क्रमांक बिझी असल्यामुळे कोणतीही प्रतीक्षा न करता तात्काळ संपर्क साधून उपलब्ध माहिती घेता येणार आहे.
20 हजार 326 बेडस् उपलब्ध
ठाणे जिल्ह्यात सध्या सुमारे 20 हजार 326 बेडस् उपलब्ध असून त्यापैकी 9044 ऑक्सिजन बेडस् आहेत. एप्रिल 2021 मध्ये आढळून आलेल्या जिल्ह्यातील एका दिवसाची सर्वोच्च रुग्ण संख्या लक्षात घेऊन त्याच्या तीनपट ऑक्सिजनची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरु आहे. जिल्ह्यातील उपचारांच्या सुविधांनुसार सीसीसीमध्ये 6825, डिसीएचसीमध्ये 6928, डिसीएचमध्ये 6573 अशा एकूण 20 हजार 326 रुग्णशय्यांची उपलब्धता आहे. त्यामध्ये विलगीकरणासाठी 8490, ऑक्सिजनची सोय असलेल्या 9044, अतिदक्षता विभागातील 2792 रुग्णशय्यांचा समावेश आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के
ठाणे जिल्ह्याचा पॉझिव्हिटी दर हा सुमारे 7.45 टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 8 लाख 91 हजार 487 एवढ्या चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात 6 हजार 318 सक्रीय रुग्ण असून त्यापैकी 900 रुग्ण सीसीसीमध्ये, 249 रुग्ण डीसीएचसीमध्ये, 464 रुग्ण डीसीएचमध्ये उपचार घेत असून सुमारे 3 हजार 396 रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. 344 रुग्ण ऑक्सिजनवर असून 26 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
ठाणे जिल्ह्यात 24 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवशी सर्वाधिक 83 हजार सक्रीय रुग्ण संख्या होती. त्याला 219 मेट्रीक ऑक्सिजनची आवश्यकता होती. आता तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी या संख्येच्या तीनपट म्हणजे 657 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीएसए प्लांट, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन साठविण्यासाठी टाक्या, सिलेंडर्स यांच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
रायगडमध्ये ‘कोरोना’चं थैमान सुरुच, नवी मुंबईतही विस्फोट; वाढत्या रुग्णसंख्येनं टेन्शन वाढलंhttps://t.co/fHduw3RwME#Corona | #NaviMumbai | #Raigad | #Coronacases
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2022
संबंधित बातम्या:
KDMC Election | केडीएमसी प्रभागांचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करणार, यावेळी 11 प्रभागांची भर