TMC Vipin Sharma: विना परवाना पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी काल सकाळी जांभळी नाका, मुख्य मार्केट परिसरातील स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती गटर्स कामांची पाहणी केली.

TMC Vipin Sharma: विना परवाना पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश
विना परवाना पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल कराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 3:47 PM

ठाणे : आता शहरात विना परवानगी पोस्टर्स, बॅनर्स लावणार असाल तर सावध. शहरातील रस्ते, दुभाजक तसेच चौकात अनधिकृतपणे जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर्स, स्टिकर तसेच भिंतीपत्रके लावून शहर विद्रुप करणाऱ्यांना महापालिका (tmc) चांगलीच अद्दल घडवणार आहे. अशा व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा- 1995′ अंतर्गत तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (vipin sharma)  यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात सुशोभिकरणांतर्गत विविध थीमद्वारे रंगरंगोटीचे कामे हाती घेण्यात आली आहेत. याद्वारे संपूर्ण शहर सुशोभित होत आहे. परंतु काही व्यक्तींकडून चौकाचौकांमध्ये होर्डिग्ज, अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर्स, स्टिकर तसेच भिंतीपत्रके लावून शहर विद्रुप करण्यात येत आहे, त्यामुळे आयुक्तांनी अशा व्यक्ती आणि संस्थांवर थेट फौजदारी (criminal offence) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील प्रमुख चौक, भिंती, रस्ते दुभाजक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक, डॉक्टर, वैद्य, मेस,नोकरी विषयक, हॉटेल्स जाहिराती लावल्या जातात. तसेच भाड्याने फ्लॅट देणारे दलाल यांच्यामार्फत स्टिकर, पत्रके, भित्तिपत्रके लावण्यात येतात. या सर्व शहर विद्रुप करणाऱ्या व्यक्तीचा तात्काळ शोध घेवून संबंधित व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा- 1995’ च्या अंतर्गत तात्काळ कारवाई करा. तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

नालेसफाई, अतिक्रमणांची पाहणी

दरम्यान, शर्मा यांनी काल सकाळी जांभळी नाका, मुख्य मार्केट परिसरातील स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती गटर्स कामांची पाहणी केली. शहरातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे, पार्किंग गाड्या तात्काळ हटविण्याचे आदेश संबंधितांना दिले. त्यांनी कोर्ट नाका येथून स्वच्छता कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली. यावेळी पेढया मारुती मंदिर ते घडयाळ टॉवर पर्यंत नाला बांधणे, पेढया मारुती गणपती मंदिर समोरील नाला मोठ्या प्रमाणावर मातीने भरला असल्यामुळे नाला स्वच्छ करण्याची कार्यवाही तातडीची सुरु करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच या परिसरात असलेले रिकामे विद्युत खांब निष्कासित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

उद्यानासमोरील पार्किंगचे आरक्षण भूखंड विकसित करा

मार्केट परिसरातील भूमिगत ड्रेनेज लाईनमधील अडथळे दूर करणे, सरस्वती अपार्टमेंट ते वैभव ट्रेडिंग रस्त्याचे पुनर्पुष्टीकरण करणे, महात्मा फुले मंडई बाहेरील सर्व अतिक्रमणे निष्कासित करुन विहीत कार्यपध्दतीने मंडई अंतर्गत ओटयांमध्ये पुनर्वसन करणे तसेच नियमित साफसफाई ठेवणे, पंडीत जवाहरलाल नेहरु बाल उद्यानामध्ये किरकोळ दुरुस्ती व लँडस्केपिंग तसेच उद्यानासमोरील पार्किंगचे आरक्षण भूखंड विकसित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबधितांना दिल्या.

नागसेन नगरमधील पाच ते सहा गल्ल्यांमध्ये टाईल्स बसविणे, शौचालय दुरुस्ती करणे, कामगार वसाहत ते मुख्य रस्त्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे, खारटन रोड लगत दोन शौचालयांमध्ये लाईट मिटर बसविणे, पार्किंगकरीता आरक्षित भूखंडाची धोकादायक कंपाऊंड वॉल बांधण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच भूखंडामध्ये नियमितपणे दुरुस्तीचे कामकाज करून दिनांक 15 मे पर्यंत कार्यशाळा विभागाकडील कार्यालय सदर ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.