Thane Corona Update: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, 24 तासांत 1685 नवे रुग्ण

मुंबईप्रमाणेच ठाण्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 1685 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या शहरात कोरोनाचे एकूण 2715 सक्रिय रुग्ण असून, कोरोनामुळे आतापर्यंत 2110 जणांचा मृत्यू झाला आहे.

Thane Corona Update: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, 24 तासांत 1685 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 7:10 PM

ठाणे : मुंबईप्रमाणेच ठाण्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 1685 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या शहरात कोरोनाचे एकूण 2715 सक्रिय रुग्ण असून, कोरोनामुळे आतापर्यंत 2110 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे सुमारे 85 ते 90 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत, तर काही जणांमध्ये सैम्य लक्षणे आहेत. असे सर्व रुग्ण हे घरूनच उपचार घेत आहेत.

लसीकरणासाठी गर्दी

संभाव्य कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या वतीने 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या पाल्याचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने पालकांना करण्यात आले आहे.

कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, गर्दी करू नये, योग्य सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. काम असेल तरच घरातून बाहेर पडावे, घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. सॅनिटायझर वापरावे, बाहेरून घरात आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध देखील घाण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या बेडची स्थिती

एकूण बेड किती-4839

सध्या किती बेडवर रुग्ण -553

रिकामे बेड किती -4286

आँक्सिजन बेड किती आहे -2770

किती भरले-60

किती शिल्लक-2710

ICU बेड किती आहे-929

भरले किती-45

शिल्लक किती-884

ठाणे शहर लसिकरणाचा तपशिल

पहिला डोस- 1432522

दुसरा डोस- 1089789

एकूण डोस -25,22,311

संबंधित बातम्या 

अंधेरी आणि कुर्ला प्रभागाचे विभाजन होणार, मुंबईतील वॉर्ड संख्या 24वरून 26 वर पोहोचणार

सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत, आंदोलनाच्या नावावर वर्गणी गोळा केली; मनिषा कायंदेंचा घणाघात

VIDEO: पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.