Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Coronavirus: ठाणे जिल्हा पुन्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये; मॉल-थिएटर्सला पुन्हा टाळं, निर्बंधांमध्ये वाढ

Coronavirus | ठाणे शहरामध्ये म्हणजे महापालिका क्षेत्रांतर्गत निर्बंधाचा स्तर हा दोन होता. यामुळे सर्व व्यवहार खुले झाले होते.मात्र जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी काढलेल्या आदेशामध्ये आता राज्यात सर्वत्र एकच स्तर म्हणजे तिस-या स्तराचे निर्बंध लागू

Thane Coronavirus: ठाणे जिल्हा पुन्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये; मॉल-थिएटर्सला पुन्हा टाळं, निर्बंधांमध्ये वाढ
कोरोना व्हायरस
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 11:02 AM

ठाणे: ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले असून संपूर्ण राज्यात निर्बंधाचा एकच स्तर म्हणजे तिसरा स्तर लागू करण्यात आला आहे.कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन प्रकारामुळे सर्व राज्यभर स्तर 3 चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.हे आदेश 28 जूनपासून 5जुलैपर्यंत लागू राहतील. (Covid restrictions in Thane level 3)

ठाणे शहरामध्ये म्हणजे महापालिका क्षेत्रांतर्गत निर्बंधाचा स्तर हा दोन होता. यामुळे सर्व व्यवहार खुले झाले होते.मात्र जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी काढलेल्या आदेशामध्ये आता राज्यात सर्वत्र एकच स्तर म्हणजे तिस-या स्तराचे निर्बंध लागू असल्याने ठाण्यात सर्व व्यवहार संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी पाचनंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली असून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील. उपहारगृहे पूर्वीप्रमाणे मात्र क्षमतेच्या 50 टक्के संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील.सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल.

खासगी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल. आता ठाणे शहरातही जिल्ह्याप्रमाणेच निर्बंध लागू राहणार असून पूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रांतर्गत स्तर 2 मुळे खुले झाले होते मात्र आता स्तर 3 मुळे निर्बंध आले आहेत.

लेव्हल 3 चे नियम

१. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

२. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

३. मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.

४. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार 50% बैठक क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी 4 वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.

५. उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..

६. सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 9 पर्यंत सुरू राहतील.

७. खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.

८. कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) 50% क्षमतेने सुरू राहतील.

९. क्रीडा- सकाळी 5 वा.पासून सकाळी 9 वा./ सायं 6 वा. पासून सायं.9 पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.

१०. चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. ११ . सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक 50% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

१२. लग्न समारंभ फक्त 50 लोकांच्या मर्यादेतच करता येतील.

१३. अंत्यसंस्कार विधी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.

१४. बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या 50 टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.

१५. बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.

१६. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.

१७. ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.

१८. जमावबंदी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.

१९. व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.

२०. सार्वजनिक परिवहन सेवा 100% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.

२१ . मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे 3 ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.

२२. खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.

२३. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.

२४. उत्पादनाच्या अनुषंगाने :

१. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन _ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)

२. सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)

३. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन

४. अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

(Covid restrictions in Thane level 3)