राबोडीतील इमारत दुर्घटनेचं खापर रहिवाश्यांवर; ठाणे महापालिका म्हणते, रहिवाश्यांकडून दुर्लक्ष

राबोडी येथील खत्री अपार्टमेंटचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. मात्र, ठाणे महापालिकेने या दुर्घटनेला इमारतीतील रहिवाश्यांनाच जबाबदार धरलं आहे. (thane corporation clarification on rabodi building slab collapse)

राबोडीतील इमारत दुर्घटनेचं खापर रहिवाश्यांवर; ठाणे महापालिका म्हणते, रहिवाश्यांकडून दुर्लक्ष
eknath shinde
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 4:55 PM

ठाणे: राबोडी येथील खत्री अपार्टमेंटचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. मात्र, ठाणे महापालिकेने या दुर्घटनेला इमारतीतील रहिवाश्यांनाच जबाबदार धरलं आहे. रहिवाश्यांना वारंवार सूचना देवून तसेच इमारत धोकादायक घोषित करून देखील रहिवाशांनी दुर्लक्ष केल्याने आजची दुर्देवी घटना घडल्याचा खुलासा ठाणे महापालिकेने केला आहे. दरम्यान राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. (thane corporation clarification on rabodi building slab collapse)

ठाणे महापालिकेच्यावतीने राबोडी येथील खत्री इमारत धोकादायक म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आली आहे. सदरच्या अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सूचना देवून देखील त्यांनी इमारत खाली केली नव्हती. याबाबत महापालिकेच्यावतीने इमारत दुरुस्तीची नोटीस बजावून, त्याचे स्मरणपत्र देण्यात आले आहे. परंतु रहिवाशांनी प्रतिसाद न दिल्याने दुर्दैवाने आजची घटना घडली आहे. घटनेनंतर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार, उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी पथकाच्या माध्यमातून सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करत इमारत पुर्णपणे खाली करून सील करण्यात आली आहे.

नोटिसा बजावण्यात आल्या होत्या

आज पहाटे 6 वाजता राबोडी येथील खत्री अपार्टमेंट या इमारतीच्या सी-विंग च्या तिसऱ्या मजल्याचे फ्लोरिंग, दुसऱ्या व पहिल्या मजल्याचे स्लॅब कोसळले. या दुर्घटनेमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. खत्री अपार्टमेंट या इमारतीची 2013 साली पाहणी करून सदर इमारतीस धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली होती. महाराष्ट्र महापालिका अधिनियमचे कलम 264 (1) (2) (3) (4) अन्वये या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून नोटिस बजावण्यात आली होती. सदर नोटिसच्या विहित मुदतीनंतरही भोगवटधारकांनी इमारत रिक्त न केल्याने कलम 268 (सी-1) अन्वये संबंधितांना नोटिस बजावण्यात आली होती. त्यानंतरही संबंधितांनी इमारत रिक्त न केल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम 268(5) अन्वये राबोडी पोलिस स्थानक यांना इमारत रिक्त करून देणेबाबत पालिकेकडून पत्र देण्यात आले होते.

वीज, पाणी कापण्याचीही नोटीस

या इमारतीस ठाणे महापालिकेने पुरविलेल्या सर्व सेवा खंडित करण्याबाबत कार्यकारी अभियंता, (पाणी पुरवठा) कार्यकारी अभियंता, (विद्युत) कार्यकारी अभियंता, (ड्रेनेज) यांना पत्र देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत संबंधितांना पत्र देण्यात आले होते. तसेच ही इमारत सी – 2– बी या वर्गवारीत असल्याचा अहवाल महापालिकेच्या तालिकेवरील स्ट्रक्चरल ऑडिटर मे.सेंटरटेक यांनी सादर केलेला असून त्यामध्ये ही इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी असे नमूद करण्यात आले होते, असं ठाणे पालिकेने म्हटलं आहे.

तीन वेळी स्मरणपत्रं पाठवले

त्यानंतर या इमारतीच्या भोगवटधारकांना आजतागायत तीन वेळा इमारतीच्या दुरुस्तीबाबत स्मरणपत्र देण्यात आली होती. त्यामध्ये इमारत तातडीने रिक्त करून दुरुस्त करावी तसे न केल्यास काही जीवित व वित्त हानी झाल्यास झालेल्या दुर्घटनेस महापालिका जबाबदार राहणार नाही, असेही पालिकेकडून नमूद करण्यात आलेले होते.

इमारत रिकामी केली नाही त्यामुळे दुर्घटना

दरम्यान, इमारतीची काही अंशी दुरुस्ती करण्यात आली. इमारतीचे 85 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, उरलेले 15 टक्के काम तातडीने दुरुस्त करा, तसे न केल्यास काही दुर्घटना घडल्यास त्यास ठाणे महानगरपालिका जबाबदार नाही असेही पत्र मे. सेंटरटेक यांनी संबंधितांना दिलेले होते. मात्र त्यालाही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. सदरची इमारत पूर्ण रिकामी करुन काम करण्यात आली नसल्याने आज दुर्दैवाने दुर्घटना घडली आहे. घटनेनंतर उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या पथकामार्फत आज सुरक्षितेच्यादृष्टीने सदरची इमारत तात्काळ खाली करून सील करण्यात आली आहे. (thane corporation clarification on rabodi building slab collapse)

संबंधित बातम्या:

भल्या पहाटे काळाचा घाला, ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार; एकजण गंभीर जखमी

पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं

उल्हासनगर स्टेशनपरिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधमाला तीन दिवसाची पोलीस कोठडी

(thane corporation clarification on rabodi building slab collapse)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.