Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

45 वर्षावरील दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य, ठाणे पालिकेचा मोठा निर्णय

ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील दिव्यांगांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. (thane corporation declared handicapped people will priority in vaccination)

45 वर्षावरील दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य, ठाणे पालिकेचा मोठा निर्णय
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 8:29 PM

ठाणे: ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील दिव्यांगांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या दिव्यांगांना रांगेत तिष्ठत उभे रहावे लागणार नाही, अशी माहिती पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली आहे. (thane corporation declared handicapped people will priority in vaccination)

लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांची गैरसोय होवू नये तसेच त्यांचे प्राधान्याने लसीकरण व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तशा सूचना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. सध्या राज्य सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते थांबविले आहे. ज्याक्षणी या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास शासनाची मान्यता मिळेल त्यावेळी स्तनदा माता व दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे, असं शर्मा यांनी सांगितलं. या निर्णयामुळे शहरातील ठाणे महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील स्तनदा माता आणि दिव्यांग बांधवांचे लसीकरण प्राधान्याने होणार आहे. संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे पालिकेने केले आहे.

येऊर गावात आदिवासींसाठी लसीकरण केंद्र

पालिकेच्या लसीकरण मोहिमेंतर्गत ऑनलाईन नोंदणीपासून वंचित असणाऱ्या तसेच लसीकरणासाठी शहरात ये-जा करणे सहज शक्य नसणाऱ्या आदिवासींचेही प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी येऊर गाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शर्मा यांनी घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या येऊर गाव, पाटीलवाडी महापालिका शाळेजवळील आरोग्य केंद्रात शुक्रवार दिनांक 4 जून 2021 पासून सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.

आदिवासी पाडे वंचित राहणार नाही

या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाईन नोंदणीकृत तसेच ‘वॉक इन’ पद्धतीने नागरिकांना लस देण्यात येत आहे. परंतु, ऑनलाईन नोंदणीपासून आदिवासी पाड्यातील नागरिक वंचित राहिले असून लसीकरणासाठी त्यांना शहरात येणे सहज शक्य नाही. यासोबतच लसीकरणाबाबत त्यांच्या मनात निर्माण झालेला गैरसमज देखील आरोग्य विभागाच्यावतीने दूर करण्यात आला आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे. (thane corporation declared handicapped people will priority in vaccination)

संबंधित बातम्या:

फडणवीस सरकारने मंजूर केलेले प्रकल्प कधी पूर्ण करणार; आमदार चव्हाण यांचा सवाल

कल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद, ठाण्यात दिवसभरात 195 जणांनी लस टोचली

(thane corporation declared handicapped people will priority in vaccination)

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.