ठाण्यातील रेव्ह पार्टीत काय काय सापडलं? मध्यरात्री पाच तास नंगानाच; त्याच जागेवर पोलिसांचा पहारा

ठाण्यातील कासारवडवली सेंडोबा मंदिर जवळील खाडी किनारी रेव्ह पार्टीचं आजन करण्यात आलं होतं. खाडीपासून 300 मीटरच्या आतमध्ये हा परिसर आहे. गणेश राऊत या व्यक्तीने रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. रात्री 10 च्या नंतर रेव्ह पार्टी सुरू झाली होती. पूर्ण जंगलाचा परिसर असल्याने कुणालाही याची खबर नव्हती. मात्र क्राईम ब्रँच युनिट 5 च्या टीमला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी रात्री 3 वाजता रेव्हा पार्टीवर छापा टाकला.

ठाण्यातील रेव्ह पार्टीत काय काय सापडलं? मध्यरात्री पाच तास नंगानाच; त्याच जागेवर पोलिसांचा पहारा
thane rave party bustedImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 2:40 PM

विजय गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 31 डिसेंबर 2023 : ठाण्यातील कासारवडवलीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या रेव्ह पार्टीत सामील झालेल्या 100 हून अधिक तरुण-तरुणीला पोलिसांना अटक केली आहे. या सर्वांकडे ड्रग्स, गांजा आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. ही सर्व मुलं चांगल्या घरातील असल्याचं सांगितलं जात आहे. कासावरडीतील खाडी परिसरातील जंगलात भयाण अंधारात या तरुण-तरुणींचा पाच तास नंगानाच सुरू होता. टिप मिळताच पोलिसांनी प्लानिंग करून छापा टाकला आणि या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ठाण्यातील सेंडोबा मंदिराजवळील कासारवडवलीच्या खाडी लगतच्या जंगलात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. गणेश राऊत नावाच्या इसमाने या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत 100 हून अधिक तरुण-तरुणी सामील झाले होते. हे सर्वजण कार आणि बाईकने आले होते. या खाडीत अनधिकृतपणे भराव टाकून जागा तयार केली होती. त्या ठिकाणीच पार्टीची व्यवस्था केली होती. अमलीपदार्थ देण्यासाठी टेबल टाकण्यात आले होते. मटण, मच्छी, चिकनचीही व्यवस्था करण्यात आली होती. दारू, बियरचीही व्यवस्था होती. तसेच डीजेही लावण्यात आला होता.

जंगल में मंगल

नशा करण्यासाठीच्या बॉटल्स, सिगारेटचे पॉकेट्स, बियरच्या बॉटल, ड्रग्स, एलएसडी, गांजा, चरस, दारू आदी अमलीपदार्थ या रेव्ह पार्टीत ठेवण्यात आले होते. डीजेच्या तालावर नशेबाज तरुण थिरकत होते. रात्री 10 वाजता ही रेव्ह पार्टी सुरू झाली. पहाटे 3 वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती. या पार्टीची कुणकुण लागल्यानंतर ठाणे पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तात्काळ प्लानिंग तयार केला. व्हॅन घेतली. अधिक कुमक मागवली आणि कासारवडवलीच्या जंगलात धाड मारली.

पाच तरुणी ताब्यात

ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांची पत्रकार परिषद घेऊन या रेव्ह पार्टीची माहिती दिली. नवीन वर्षानिमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश आम्हाला पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार आम्ही लक्ष ठेवून होतो. त्याचाच एक भाग म्हणून गुन्हे शाखेच्या पथकाने या रेव्ह पार्टीचा भांडाफोड केला आहे. खाडीलगत असणाऱ्या अंधाऱ्या भागात ही रेव्ह पॉर्टी सुरू होती. प्रॉपर प्लॅनिंग करुन तिथे आम्ही छापा टाकला.ड्रग्ज विकले जात होते आणि पार्टी सेलिब्रेशन केले जात होते. या पार्टीतील 90 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि 5 तरुणींनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच या सर्वांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असल्याचं शिवराज पाटील यांनी सांगितलं.

ड्रग्ज नेमके आले कुठून? तपास सुरू

रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्या आयोजकांनी यापूर्वी अशी पार्टी आयोजित केली होती का? याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच हे ड्रग्ज नेमके कुठून आणले? याची माहिती घेण्यात येत आहे. तेजस अनिल कुबल हा या आयोजकांपैकी एक आहे. त्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आणखी एकाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. तेजस कुबल हा गोव्यात देखील अशा पार्ट्या आयोजित करत होता, अशी माहिती आम्हाला मिळालेला आहे. तपासात यांना नेमक कोण मदत करत होत याचीही चौकशी करण्यात येईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली. तसेच ज्या ठिकाणी रेव्ह पार्टी सुरू होती, त्या ठिकाणी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.