कुठे आरती तर कुठे हरहर महादेवचा जयघोष… दीड वर्षानंतर ठाणे जिल्ह्यात दिसला भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम

कुठे आरती, कुठे पूजा, तर कुठे हरहर महादेवचा जयघोष... असा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळाला. (Thane District temple reopen today)

कुठे आरती तर कुठे हरहर महादेवचा जयघोष... दीड वर्षानंतर ठाणे जिल्ह्यात दिसला भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 10:22 AM

ठाणे: कुठे आरती, कुठे पूजा, तर कुठे हरहर महादेवचा जयघोष… असा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळाला. तब्बल दीड वर्षानंतर आज घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील मंदिरे उघडण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातच नव्हे तर आज संपूर्ण राज्यात हेच चित्रं होतं.

तब्बल दीड वर्षानंतर मंदिरे उघडणार असल्याने आज पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती. सकाळी सकाळीच देवाला फूल हार अर्पण करून भाविकांनी मनोभावे पूजा केली. पहाटेच्या आरतीतही अनेक भाविक सहभागी झाले होते. तब्बल दीड वर्ष बंद असलेल्या मंदिरातून आज सकाळीच टाळ मृदूंग आणि आरतीचे आवाज येत होते. त्यामुळे संपूर्ण वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती. यावेळी प्रत्येक मंदिरात कोरोना नियमांचे पालन करण्यात येत होतं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतानाच भाविकांनी तोंडाला मास्कही लावले होते. तसेच मंदिर व्यवस्थापनाकडून सॅनिटायझरची व्यवस्थाही केली होती.

शिवमंदिरात गर्दी

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचीही दारं अखेर आज उघडली. शिवभक्त आणि मंदिराच्या पारंपरिक पुजाऱ्यांनी मंदिराचं दार उघडलं. त्यामुळे तब्बल अठरा महिन्यानंतर भाविकांना महादेवाचं दर्शन घेण्यात आलं. मंदिराचं दार उघडताच अवघ्या काही तासात भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. त्यानंतर भाविक आणि पुजाऱ्यांचा हर हर महादेवचा जयघोष घुमला. अंबरनाथच नव्हे तर ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर, कल्याण, उल्हासनगर, बदलापूरमध्येही हेच चित्रं होतं. मुंब्र्यातील मंदिरातही मोठी गर्दी झाली होती. तर कल्याणच्या हाजीमलंग गडावरही पहाटे पहाटे भाविकांनी गर्दी केली होती.

जीवदानी डोंगर भक्तांनी फुलला

विरारचे प्रसिद्ध जीवदानी देवी देवस्थान भक्तांसाठी आजपासून सुरू झाले. देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर यांच्या हस्ते आज पहाटे 6 वाजता मंदिराचे गेट उघडून भक्तांना प्रवेश देण्यात आला. दीड वर्षांपासून शुकशुकाट असणाऱ्या जीवदानीचा डोंगर आज भक्तांनी फुलून गेला आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला असून आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले.

संबंधित बातम्या:

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी

Maharashtra Temple Reopening Live Update | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबादेवी मंदिरात दर्शनाला

देश अंधारात बुडण्याची भीती, केंद्राने वेळीच पावलं उचलली असती तर वीजनिर्मितीवर प्रश्नचिन्ह नसतं, सामनातून टीकेचे बाण

(Thane District temple reopen today)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.