ठाणे जिल्हाचा बारावीचा निकाल 92.67 टक्के, कल्याण ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थांचा निकाल अव्वल

ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.67 टक्के लागला आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.

ठाणे जिल्हाचा बारावीचा निकाल 92.67  टक्के,  कल्याण ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थांचा निकाल अव्वल
ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.67 टक्के लागला आहे.
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 4:08 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 चा इयत्ता बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यंदा ठाणे जिल्हाचा निकाल 92.67 टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हात 88 हजार 431 विद्यार्थी उत्तीर्ण

यंदा ठाणे जिल्ह्यातील 95420 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 88 हजार 431 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 50 हजार 477 मुले प्रविष्ट झाले होते त्यापैकी 46296 मुले उत्तीर्ण झाले. तर 44943 मुली प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी 42135  मुली उत्तीर्ण झाल्या. अशाप्रकारे मुलांचा 91.71 टक्के निकाल लागला तर मुलींचा 93.75 टक्के लागला आहे. त्याचबरोबर कोकण विभागात रायगड पाठोपाठ ठाणे जिल्हाचा सर्वाधिक निकाल लागला आहे.

हे सुद्धा वाचा

ठाणे जिल्हात कल्याण ग्रामीण क्षेत्र अव्वल

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण डोंबिवली मनपा , उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये कल्याण ग्रामीण क्षेत्रातील ९५.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हात कल्याण ग्रामीण क्षेत्रातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.