AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane: प्रामाणिक शिवसैनिकांना त्रास दिल्यास जशास तसे उत्तर देऊ- रुपेश म्हात्रे यांचा इशारा

ठाणे,  शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या विचारांशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहणाऱ्या शिवसैनिकांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशाच तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे (Rupesh Mhatre) यांनी शहापूर येथे एकनिष्ठ शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना दिला. एकनिष्ठ शिवसैनिक आजही आपल्यासोबत असून जे गेलेत त्यांचा विचार न करता […]

Thane: प्रामाणिक शिवसैनिकांना त्रास दिल्यास जशास तसे उत्तर देऊ- रुपेश म्हात्रे यांचा इशारा
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 4:45 PM

ठाणे,  शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या विचारांशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहणाऱ्या शिवसैनिकांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशाच तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे (Rupesh Mhatre) यांनी शहापूर येथे एकनिष्ठ शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना दिला. एकनिष्ठ शिवसैनिक आजही आपल्यासोबत असून जे गेलेत त्यांचा विचार न करता आपण एकजुटीने पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहू, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे यांनी या वेळी केले. मार्गदर्शन सभेप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही कायम राहणार असल्याची ग्वाही शहापूर तालुक्यातील उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. गुरुवारी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांची शहापुरात मार्गदर्शन सभा होणार असून, त्यात बंडखोर पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.

शहापुरातील तळागाळातील प्रामाणिक व शिवसेना आहे त्या जागेवर असून, पंचायत समिती शहापूर येथील सभागृहात भिवंडी लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शन सभेसाठी तालुक्‍यातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक हीच ओळख- रामदास कदम

रामदास कदम यांनी सोमवारी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे शिंदे गटाकडून त्यांची याच पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आता नेमकी रामदास कदम यांची ओळख काय म्हणून असणार असा प्रश्न त्यांना करण्यात आला होता. मात्र, आपण बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक होतो आणि भविष्यातही राहणार. शिवाय त्यांनीच मला हे पदही दिले होते. त्यामुळे माझी ओळख ही बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या राजकीय परस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागत असला तरी आपण आगोदर शिवसैनिक आणि नंतर सर्वकाही अशीही प्रतिक्रिया कदमांनी शिवसेना पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरही दिली आहे.

हे सुद्धा वाचा

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.