Video | बाबो ! एसीत अडकला कोब्रा नाग; बाहेर काढण्यासाठी कापावा लागला एसी
ठाण्यातील मोहन हाईट्स गृह निर्माण संकुलाच्या कार्यालयात एक अजब प्रकार घडला. या कार्यालयातील एसीमध्ये चक्क कोब्रा अडकला. हा नाग एसीच्या पंख्याखाली असलेला पत्रा व पाईपमध्ये अडकून पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी नंतर एसी कापावा लागला.
ठाणे : ठाण्यातील मोहन हाईट्स गृह निर्माण संकुलाच्या कार्यालयात एक अजब प्रकार घडला. या कार्यालयातील एसीमध्ये चक्क कोब्रा अडकला. हा नाग एसीच्या पंख्याखाली असलेला पत्रा व पाईपमध्ये अडकून पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी नंतर एसी कापावा लागला. या अडकून पडलेल्या सापाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
एसी बंद पडल्याने अडकला साप
कल्याणमध्ये मोठी गृहसंकुले उभारण्यात आली आहेत. या भागात मोहन हाईट्स नावाच्या गृहनिर्माण संकुलाचे कार्यलय आहे. काल (22 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमाराला कार्यलयाच्या मागे एका एसीमध्ये कोब्रा नाग शिरला होता. एसीमध्ये नाग शिरल्यामुळे तो अचानकपणे बंद पडला. त्यानंतर कामगाराने पाहणी केल्यानंतर एसीमध्ये कोब्रा नाग अडकल्याचे दिसून आले. त्याने नाग एसीमध्ये घुसल्याची माहिती अन्य कामगार तसेच मॅनेजरला दिली. त्यांनतर रुपेश पाटील नावाच्या व्यक्तीने सर्पमित्र हितेश करंजळकर याला याबाबत सांगितले. ही माहिती समजताच हितेश यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली. तेव्हा कोब्रा नाग एसीतील पत्रा व पाईपच्या गॅपमध्ये अडकल्याचे दिसले. त्यांनतर एसी दुरुस्ती करणाऱ्या कारागिराला बोलवून एसीचा पाईप व पत्रा ग्रॅन्डरच्या मदतीने कापण्यात आला.
पाहा व्हिडीओ :
कोब्रा नागला इजा न पोहचवता काढले बाहेर
विशेष म्हणजे सापाला इजा होऊ नये म्हणून त्याच्या फण्याकडील भाग एका प्लॉस्टिकच्या बाटलीत बंद करून त्यावर कपडा बांधण्यात आला. त्यानंतर सर्पमित्र हितेशने नागाला शिताफीने पकडून ठेवले. नागाला इजा न पोहोचवता पत्रा व पाईप ग्रॅन्डरच्या मदतीने कापून काढण्यात आला. नंतर मोठ्याशिताफीने या नागाला एसीमधून बाहेर काढण्यात आले. कोब्रा नाग सर्पमित्राने पकडल्याचे पाहून कार्यलयातील कामगारांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा साप इंडियन कोब्रा जातीचा विषारी नाग असून त्याची लांबी 4 फूट आहे. या कोब्रा नागाला वन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जंगलात सोडल्याचे सर्पमित्र हितेश याने सांगितले.
इतर बातम्या :
फक्त राज ठाकरेच नाही तर आई आणि बहिणीलाही कोरोना, नेमकं काय म्हणाले डॉ. जलील पारकर?
पेट्रोलच्या दरवाढीने जनता हैराण, रामदेवबाबांचं एकच वाक्य, म्हणाले हे स्वप्न…
VIDEO : Raj Thackeray Covid Positive | Dr. Jalil Parkar यांनी दिली राज ठाकरे यांच्या तब्येतीची माहिती @RajThackeray #coronapositive pic.twitter.com/nb1JnNzi3W
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2021
(thane kalyan cobra snake stuck in ac fan man rescued him successfully)