TMC Commissioner : कळवा येथील स्मशानभूमी व तरणतलावाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

जलतरणपटूंसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था बाहेरच्या बाजूला करावी, स्वच्छतागृहामध्ये पाणी तसेच स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे पाणी शुध्दीकरण प्लान्टची जेथे गळती होत आहे त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

TMC Commissioner : कळवा येथील स्मशानभूमी व तरणतलावाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 12:01 AM

ठाणे : ठाणे शहरातील विविध प्रभाग समितीमध्ये असलेल्या स्मशानभूमींचा पाहणी दौरा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी सुरू ठेवला आहे. आज कळवा येथील मनिषानगर मधील स्मशानभूमीची व कै.यशवंत राम साळवी तरण तलावाची पाहणी (Inspections) अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन या ठिकाणी आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यास आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या समवेत राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, माजी नगरसेविका प्रमिला केणी, अपर्णा साळवी, मनाली पाटील, उप आयुक्त मारुती खोडके, मनीष जोशी, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, कार्यकारी अभियंता मनोज तायडे, मोहन कलाल, विकास ढोले व इतर अधिकारी उपस्थित होते. (Thane Municipal Commissioner inspected the cemetery and swimming pool at Kalwa)

कळवा स्मशानभूमीच्या कामाचीही केली पाहणी

कळवा येथील मनिषानगरमधील स्मशानभूमी खूप जुनी स्मशानभूमी आहे. तसेच मध्यवर्ती ठिकाणी ही स्मशानभूमी असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर अत्यंविधी होत असतात. या ठिकाणी डिझेल शववाहिनी असून येथे महानगर गॅसची पीएनजी शवदाहिनी उपलब्ध करणेसाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा करावा, विद्युत शवदाहिनीमधून निघणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिकांना होवू नये यासाठीही उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सद्यस्थितीत मनिषानगर स्मशानभूमीचे काम सुरू आहे. या ठिकाणी नवीन चुल्हे बसविण्याचे काम सुरू आहे. परंतु सदरचे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे आठ महिन्याचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान गैरसोय होवू नये यासाठी तात्पुरत्या स्वरुपात शेड टाकून चुल्हे बसविण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अत्यंविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची सोय, शव ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करावी तसेच पिण्याचे पाणी व इतर रंगरंगोटीची कामे देखील तातडीने करण्याबाबतच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.

तरणतलावाच्या स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

दरम्यान आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मनिषानगर येथील कै. यशवंत रामा साळवी तरणतलावाची देखील पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी महापालिकेच्या कै. यशवंत रामा साळवी तरणतलावाची पाहणी केली. तरणतलाव सुरु करताना या ठिकाणी आवश्यक असलेली किरकोळ कामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच जलतरणपटूंसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था बाहेरच्या बाजूला करावी, स्वच्छतागृहामध्ये पाणी तसेच स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे पाणी शुध्दीकरण प्लान्टची जेथे गळती होत आहे त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (Thane Municipal Commissioner inspected the cemetery and swimming pool at Kalwa)

इतर बातम्या

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पुन्हा सीआरपीएफ जवानांवर गोळीबार, एक जवान शहिद

Chandrapur Crime : युवतीचा डोके छाटलेला मृतदेह आढळला, चंद्रपूरमध्ये खळबळ

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.