ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त (Thane Municipal Commissioner) डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या दोन दिवसात माजिवडा – मानपाडा प्रभाग समिती आणि कळवा प्रभाग समितीमधील एकूण 13 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान यापुढेही सर्व प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. (Thane Municipal Corporation cracks down on 13 unauthorized constructions in city)
या कारवाईतंर्गत कासारवडवली येथील 8 अनधिकृत दुकान गाळे आणि 1 खोलीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. तर बाळकूम येथील इमारतीमध्ये 3 अनधिकृत वाढीव बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच कळवा प्रभाग समितीमधील 1 बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर आणि सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने पूर्ण केली.
महामारीतल्या या गर्दीचं करायचं तरी काय? मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या धबधब्यावर जल्लोषhttps://t.co/aFZPB5t8AN#MumbraWaterfall #Waterfall #CoronaVirus #Corona #SocialDistancing #Mumbra #Thane
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 27, 2021
इतर बातम्या
नियम बदलले, कल्याण-डोंबिवलीत आता दुकाने 4 वाजेपर्यंतच, बसमध्ये उभं राहून प्रवास करता येणार नाही
मुंबईपाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण ! 116 नागरिकांना दिली भेसळयुक्त लस, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी ठाण्यात ‘वॉक इन’ लसीकरण सुविधा
(Thane Municipal Corporation cracks down on 13 unauthorized constructions in city)