ठाणे महापालिकेची धडक कारवाई, शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरुच असून आज 4 वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

ठाणे महापालिकेची धडक कारवाई, शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
unauthorized constructions
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 8:39 PM

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरुच असून आज 4 वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thane Municipal Corporation cracks down on unauthorized constructions in city, Filed a crime against one)

या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील जीवदानी नगर वैभव ढाब्याच्या मागील तळ अधिक 2 मजले व्याप्त असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील वाढीव बांधकामाचे एकूण 21 आरसीसी कॉलम तोडण्यात आले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती 1, नौपाडा प्रभाग समिती 1 आणि कळवा प्रभाग समितीमधील 1 वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत.

सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर, डॉ. अनुराधा बाबर, शंकर पाटोळे आणि सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

दरम्यान दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 397 (क) (1) ख, अन्वये रमेश रतन भगत यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाणे येथे फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरु आहे. याचदरम्यान शनिवारी (3 जुलै) दिवा प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रादेवी कॉलनी येथील 3 मजली इमारतीतील 4 थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत पोखरण रोड क्र. 1, उपवन इंडस्ट्रीज प्लॉट न. 206 येथील रवी अच्युत पुजारी यांच्या 32 × 52 चौ. फूट मोजमाप असलेल्या जागेवर विटांची भिंत व लोखंडी अँगलची उभारणी करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सदरचे बांधकाम आज जेसीबी मशीनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले.

इतर बातम्या

डोक्यात बेंच टाकला, प्रचंड गदारोळ, लसीकरण केंद्रावर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

आगरी समाजाची मनधरणी, महापालिका निवडणूक, तीन जिल्ह्यांचे राजकीय गणितं, कपिल पाटलांना केंद्रीय मंत्रिपद देण्यामागील खरी कारणं

अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क एसीबीच्या जाळ्यात, दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ

(Thane Municipal Corporation cracks down on unauthorized constructions in city, Filed a crime against one)

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.