Thane : तुम्हाला मिळणारी हवा आणखी शुद्ध होणार, ठाणेकरांना अनेक नव्या योजनांचा लाभ

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फ़त अंदाजे 48 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामधून ठाकरांसाठी अनेक नव्या सुधारणा होणार आहेत.

Thane : तुम्हाला मिळणारी हवा आणखी शुद्ध होणार, ठाणेकरांना अनेक नव्या योजनांचा लाभ
ठाणे महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपला
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 8:33 PM

ठाणे : 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील मिलियन प्लस सिटीज गटांतर्गत ठाणे शहराला मिळालेल्या प्राप्त निधीच्या विनीयोगासाठी ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फ़त अंदाजे 48 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वच्छ हवा कृती आराखड्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधितांना दिले आहेत.

हवेचा दर्जा सुधारण्यासाठी खर्च करणार

स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत उपलब्ध निधीचे योग्य वितरण आणि विनीयोग करण्यासाठी समिती गठीत करून कृती आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधितांना यापूर्वीच दिले होते. त्या अनुषंगाने समिती मार्फत स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत विविध कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे . सदर समिती मार्फत 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत हवेच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी प्राप्त झालेल्या अनुदानाच्या विनियोगासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विविध कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

परिवहन सेवेकरिता 81 इलेक्ट्रिक बसेस

या कृती आराखड्यामध्ये शहरात परिवहन सेवेकरिता 81 इलेक्ट्रिक बसेस भाडेपट्टी पद्धतीने चालविणे, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत सुरेंद्र इंडस्ट्रीज रस्त्यावर कार्निव्हेन हॉटेल ते पवारनगर बस स्टॉपपर्यंत सायकल ट्रक बांधणे, जय भवानी नगर, वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीमध्ये एलपीजी आणि पीएनजी शवदाहिनी बांधणे, महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांच्या दैनंदिन साफसफाईसाठी डस्ट स्वीपिंग मशीन खरेदी करणे, मोघरपाडा येथे हॉर्टीकल्चर कंपोस्ट प्लांट उभारणे, ई कार आणि ई रिक्षा खरेदी करणे, तीन हात नाका आणि माजिवडा चौक येथे धूळ नियंत्रणासाठी मिस्ट स्प्रे मशीन खरेदी करणे, हवा प्रदूषण मोजणीची माहिती हाजूरी येथील डॅशबोर्डवर जोडणी करणे,अस्तित्वातील एमआरएफ केंद्राचे मजबुतीकरण करण्यासाठी उपकरण खरेदी आणि बायो डायजेस्टर टॉयलेट उभारणे, हवा सर्वेक्षण फिरती प्रयोगशाळा उभारणे तसेच हवा सर्वेक्षण केंद्राचे मजबुतीकरण करणे आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

Mumbai Crime: बादशाह मलिकला 24 डिसेंबरपर्यंत ईडी कोठडी, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई

Thane : महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा, कुठे उभारणार स्मारक? वाचा सविस्तर

Breaking | शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची आठ तास ईडीकडून चौकशी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.