पाण्याचे दोन टँकर, खाद्यपदार्थ ते 5 हजार सतरंजी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे 100 अधिकारी-कर्मचारी रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेची विविध पथके महाडला रवाना होत आहेत.

पाण्याचे दोन टँकर, खाद्यपदार्थ ते 5 हजार सतरंजी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे 100 अधिकारी-कर्मचारी रवाना
पाण्याचे दोन टँकर, खाद्यपदार्थ ते 5 हजार सतरंजी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे 100 अधिकारी-कर्मचारी रवाना
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 3:48 PM

ठाणे : रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी आज रवाना करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेची विविध पथके महाडला रवाना होत आहेत. महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्तांच्या समन्वयाने ही पथके मदत कार्य करणार आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतासाठी जाणाऱ्या पथाकामध्ये ‘या’ विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश

या विविध पथकातंर्गत आरोग्य पथक पाठविण्यात येणार आहे. या पथकामध्ये कोविड, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके पाठविण्यात येणार आहेत. या पथकांसोबत 10 हजार रॅपीड ॲंटीजन टेस्टींग कीटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टींग कीटस्, तीन डॅाक्टर्स, नर्सेस, वॅार्डबॅाय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात येणार आहे.

साफसफाई, फवारणीसाठी सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, फायलेरिया कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत 24 पंप, 4 स्प्रेईंग मशीन, 4 फॅागिंग मशीन, सोडियम हायपोक्लाराईड आणि फवारणीसाठी लागणारे सर्व रसायणे आदीसह सुसज्ज 90 कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात येत आहे.

पूरग्रस्तांसाठी ‘या’ वस्तू पाठविल्या जाणार

तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 10 हजार लिटर्स पाण्याचा एक टॅंकर आणि स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा 10 हजार लिटर्स क्षमतेचा एक टॅंकर असे एकूण दोन टॅंकर पाठविण्यात येत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे दोन ट्रक, रेशनिंग, किटस्, 5 हजार सतरंजीही पाठविण्यात येणार आहेत.

मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांची तातडीने विल्हेवाट लावता यावी यासाठी महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीमही रवाना होत आहे. या सर्व पथकांसोबत महापालिकेच्या 8 ते 9 मिनी बसेस, दोन डंपर, 2 ट्रक, 4 जीप आणि इतर साहित्य पाठविण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे महाडमध्येच तळ ठोकून

दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफ जवानांचे एक पथक पहिल्या दिवसांपासून मदत कार्यात गुंतले आहे. खुद्द एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के हे दोन दिवस महाड येथे तळ ठोकून मदत कार्यावर लक्ष ठेवून होते. महापालिकेची ही विविध पथके उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आणि आगार व्यवस्थापक दिलीप कानडे यांच्या अधिपत्त्याखाली रवाना होणार असून ही पथके स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने मदत कार्य करणार आहेत.

कोविड चाचणी आणि ताप सर्वेक्षण

महाड आणि पोलादपूर येथील नैसर्गिक आपत्तीनंतर कुठलाही साथरोग उद्भवू नये तसेच कोविडचा संसर्ग वेळीच प्रतिबंधीत करता यावा यासाठी मोबाईल टेस्टींग व्हॅन, १० हजार रॅपिड ॲंटीजन टेस्टींग कीटस् तसेच ताप सर्वेक्षणासाठी थर्मल गन्स, ॲाक्सीमीटर, मोठ्या प्रमाणात औषध साठा आणि कर्मचाऱ्यांची टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. तसेच साथरोग नियंत्रणासाठीही स्वतंत्र वैद्यकीय पथक रवाना होत असल्याचे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा :

पूरग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा कधी करणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात….

मुख्यमंत्री म्हणाले, ‘कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही’, ठाणे शिवसेनेकडून कोकणातील 25 हजार कुटुंबियांना मदत!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.