TMC Plastic Karvai : प्लास्टिक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई, 114 किलो प्लास्टिक जप्त
सदर मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टिक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण 114 किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून 48 हजार 500 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
ठाणे : प्लास्टिक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये सुमारे 114 किलो प्लास्टिक जप्त (Plastic Seized) करून 48 हजार 500 रुपये दंड (Penalty) वसूल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अविघटनशील कचरा ( नियंत्रण ) कायदा 2006 अंतर्गत महाराष्ट्र शासनद्वारे प्लासिटीक व थर्माकोल इत्यादीपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक)वर बंदी घालण्यात आली आहे. तथापि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर बंदी मोडून प्लास्टिक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे.
एकूण 114 किलो वजनाचे प्लास्टिक जप्त
सदर मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टिक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण 114 किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून 48 हजार 500 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त मनीष जोशी व आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या 9 प्रभाग समितीमधील स्वच्छता निरीक्षक तसेच विभागातील कर्मचारी आदींनी केली.
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचे आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी यंदा पावसाळ्यात कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठविलेल्या किंवा साचलेल्या पाण्यात, धुणी-भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम्स, घराच्या आसपास पडलेल्या नारळ्याच्या करवंट्या, वाहनांचे टायर्स, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, हवाबंद झाकण नसलेले हौसिंग सोसायट्यांचे ओव्हरहेड टँक्स आदींमध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क होऊन काळजी घेण्याचे आयुक्तांनी सांगितले. (Thane Municipal Corporation seized 114 kg of plastic from establishments using plastics and thermocol)